Eknath Shinde | (Photo Credits: Facebook)

आषाढी वारी सोहळा दोन वर्षानंतर मोठ्या उत्साहात पार पडत आहे.  संत तुकोबा ज्ञानोबाच्या पालख्यांसह अनेक मानाच्या पालख्या पंढरपूरकडे रवाना झाल्या आहेत. या सर्व पालख्या 9 जुलैला पंढरपूरात पोहचेल. तर 10 जुलैला आषाढी एकादशी आहे. आषाढी एकादशीनिमित्त पंढरपुरात विठ्ठल-रुक्मिणी यांची शासकीय महापूजेचा मान राज्याच्या मुख्यमंत्र्यांचा असतो. यंदा विठ्ठल-रुक्मिणी शासकीय महापूजेचा मान मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना मिळाला आहे. एकनाथ शिंदे राज्याचे वीसावे मुख्यमंत्री असुन शिवसेनेचे चौथे मुख्यमंत्री आहेत.

 

गेल्या वर्षी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि पत्नी रश्मी ठाकरे यांनी पूजा केली होती. पण  गेल्या काही दिवसापूर्वी राज्यात झालेला सत्ता संघर्ष पाहता यंदाच्या पूजेसाठी  उद्धव ठाकरे जाणार की देवेंद्र फडणवीस अशा चर्चा सुरू होत्या. अखेर या चर्चांना आता पूर्णविराम मिळाला आहे. राज्याचे नवे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यावर्षी पंढरपूरात शासकीय महापूजा करणार यावर शिक्का मोर्तब झाला आहे.  ( हे ही वाचा:-Pandharpur Wari 2022: कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष Nana Patole सोलापूर मध्ये दाखल झालेल्या संत तुकाराम महाराजांच्या पालखी त सहभागी)

 

आजपर्यंत सर्वाधिक वेळा या शासकीय पूजेचा मान हा दिवंगत मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांना मिळाला आहे.  तर भाजप शिवसेना युती दरम्यान हा मान देवेंद्र फडणवीसांना मिळाला आहे. पण यावर्षीची होणारी शासकीय महापूजा विशेष असेल कारण पहिल्यादाचं राज्याचे नवे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ही पूजा करणार आहेत. राज्याच्या राजकारणातील एकनाथ शिंदे हे शिवसेनेचे चौथे मुख्यमंत्री आहेत. यापूर्वी शिवसेनेचे मनोहर जोशी, नारायण राणे आणि बाळासाहेब ठाकरेंचे पुत्र खुद्द उध्दव ठाकरेंनी मुख्यमंत्री पदाची धुरा सांभाळली आहे.

 

तसेच दरवर्षी आषाढी एकादशीच्या शासकीय महापूजेत सहभागी होण्याचा मान एका वारकरी सामान्य दामपत्यास मिळतो. हे दामपत्य पहाटे मुख्यमंत्र्यासोबत विठ्ठलाची महापूजा करतात. दर्शन रांगेतील भविकातून मानाचा वारकरी निवडण्याची परंपरा आहे.