Arvind Kejriwal Swearing-In Ceremony: आम आदमी पार्टी (Aam Aadmi Party) संयोजक अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal)यांनी आज (रविवार, 16 फेब्रुवारी 2019) दिल्ली येथील रामलीला (Ramlila Maidan) मैदानावर दिल्लीचे मुख्यमंत्री (CM Of Delhi) म्हणून तिसऱ्यांदा शपथ घेतली. दिल्लीचे राज्यपाल अनिल बैजल यांनी त्यांना पद आणि गोपनियतेची शपथ दिली. मुख्यमंत्री केजरीवाल यांच्यासोबत मीनष सिसोदिया यांनी उप-मुख्यंमंत्री आणि दिल्लीचे शिक्षणमंत्री म्हणून शपथ घेतली. केजरीवाल, सिसोदिया यांच्यासह आपच्या 6 मंत्र्यांनी मंत्रिपद आणि गोपनियतेची शपथ घेतली. केजरीवाल यांनी शपथ घेतल्यानंतर भाषण केले आणि गाणेही गायले. रामलीला मैदानावर पार पडलेल्या या सोहळ्यात सत्येन्दर जैन, गोपाल राय, कैलाश गहलोत, इमरान हुसैन, राजेन्द्र पाल गौतम आदी मंत्र्यांनीही अनुक्रमे शपथ घेतली.
रामलीला मैदानावर शपथविधीनंतर भाषण करताना मुख्यमंत्री केजरीवाल यांनी दिल्लीच्या जनतेला उद्देशून भाषण केले. तसेच, 'हम होंगे कामयाब एक दिन...' हे गानेही म्हटले. दरम्यान, या वेळी बोलताना केजरीवाल आपल्या भाषणात म्हणाले, या शपथविधी सोहळ्यासाठी मी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाही निमंत्रण दिले होते. परंतू, ते आले नाहीत. कदाचीत काही महत्त्वाच्या कामात असतील किंवा इतर काही कार्यक्रमात व्यग्र असतील. परंतू, दिल्लीचा विकास करणे आणि दिल्लीला पुढे घेऊन जाण्यासाठी मी त्यांचे आशीर्वाद घेऊ इच्छितो. (हेही वाचा, Arvind Kejriwal Swearing-In Ceremony: अरविंद केजरीवाल आज घेणार मुख्यमंत्री पदाची शपथ; संपूर्ण कार्यक्रमाचे वेळापत्रक, वाहतूक मार्ग आणि पोलीस बंदोबस्त याविषयी घ्या जाणून)
एएनआय ट्विट
Arvind Kejriwal takes oath as Chief Minister of Delhi for a third term pic.twitter.com/cgfhmBEAgl
— ANI (@ANI) February 16, 2020
पुढे बोलताना केजरीवाल यांनी म्हटले की, एका आईसाठी मुलाचे प्रेम मोफत असते. म्हणूनच अशा मुख्यमंत्र्यासाठी हे लज्जास्पद आहे की जो शिक्षणासाठी मुलांकडून पैसे घेतो, त्यांना आरोग्याचे उपचार मोफत देत नाही. पुढे बोलताना ते म्हणाले, दिल्ली मॉडेल आता संपूर्ण देशात दिसत आहे. एक दिवस भारताचे नाव जगभरात घेतले जाईल. 'हम होंगे कामयाब' गीत म्हणत आणि वंदे मातरम.. भारत माता की जय या घोषणा देत केजरीवाल यांनी आपले भाषण आटोपले.
एएनआय ट्विट
#WATCH Arvind Kejriwal takes oath as Chief Minister of Delhi for a third term pic.twitter.com/C66e3cgxXw
— ANI (@ANI) February 16, 2020
केजरीवाल यांच्या शपथविधी सोहळ्याला विविध क्षेत्रातील अनेक लोक उपस्थित राहणार होते.. यात डॉक्टर, टीचर्स, बाइक ऐम्बुलेंस राइडर्स, सफाई कर्मचारी, कंस्ट्रक्शन वर्कर्स, बस मार्शल, ऑटो ड्राइवर यांचाही समावेश होता.