Sharad Pawar Amol Kolhe | (Photo Credits: Archived, edited, symbolic images)

 Maharashtra Political Crisis 2023: अजित पवार यांनी राष्ट्रवादीत बंडखोरी केली आणि राज्यातील राजकराणात मोठा भुकंपाचा धक्का लागला. पक्षात फुट पाडल्यानंतर अजित पवारांसह 9  मंत्र्यांनी शपथ घेतल्या. राज्यातील या राजकीय भुकंपामुळे खळबळ उडाली. रविवारी अजित पवारांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. या राजकीय भुकंपानंतर अनेक राजकिय नेत्यांनी आपआपली भुमिका स्पष्ट केली. सोमवारी 3 जुलै रोजी अमोल कोल्हे यांनी आपली भुमिका स्पष्ट केली आणि सोशल मीडियावरून त्यांनी या संदर्भात पोस्ट सुध्दा शेअर केली.

सदर पोस्ट मध्ये मी शरद पवार यांच्या सोबत असल्याची भुमिका मांडली. PTI वृत्तसंस्थेसी  सांगताना म्हणाले की, मी शरद पवार यांच्या सोबत आहे. मी माझा शेरूड येथील खासदारकी पदाचा राजीनामा शरद पवार यांच्याकडे देणार आहे. मला शपथविधी सोहळा आहे हे माहित नव्हतं.

मंगलवारी (4 जुलै) अमोल कोल्हे  शरद पवारांची भेट घेणार आहे आणि या भेटीत खासदारकी पदाचा राजीनामा देणार आहेत. या राजकारणासाठी मी आलेलोच नाही, अशी माझी सरळ स्वच्छ भावना होती.” असे अमोल कोल्हे एका वृत्तसंस्थेशी सांगताना म्हणाले.