Lok Sabha Election 2019: अक्षय कुमार BJP कडून लोकसभा निवडणूकीच्या रिंगणात उतरणार?
Akshay Kumar with Narendra Modi (Photo Credits: File Photo)

भारतामध्ये लोकसभा निवडणूका 2019 (Lok Sabha Election) ची घोषणा करण्यात आली आहे. देशभरात सात आणि महाराष्ट्रात चार टप्प्यामध्ये ही निवडणूक पार पडणार आहे. या निवडणूकीसाठी राजकीय पक्षांनी आपल्या उमेदवारांची यादी जाहीर करण्यास सुरूवात केली आहे. काही कलाकार मंडळीदेखील यंदा निवडणूकीमध्ये आपले नशीब आजमवणार आहेत. यामध्ये अक्षय कुमार (Akshay Kumar)  या 'खिलाडी'चीदेखील चर्चा आहे. भारतीय जनता पक्षाकडून (BJP) अक्षय कुमार रिंगणात उतरणार अशी चर्चा सध्या रंगायला लागली आहे. 'जयकांत शिक्रे' फेम अभिनेता प्रकाश राज लोकसभा निवडणूक 2019 लढणार

न्यूज 18 च्या बातमीनुसार, भारतीय जनता पक्षाच्या तिकीटावर दिल्लीतील चांदनी चौक मतदारसंघातून अभिनेता अक्षय कुमार याला तिकीट मिळण्याची शक्यता आहे. अशी चर्चा आहे. जगभरातील अक्षय कुमार याची फॅन फॉलोविंग लक्षात घेता तसेच पॅडमॅन, टॉयलेट एक प्रेमकथा अशा विषयावर आधारित सिनेमाची निवड केल्यानंतर अक्षय कुमार याची सामाजिक प्रश्नांकडे त्याचे असलेले भान आणि रसिकांमधील लोकप्रियता लक्षात 'एनकॅश' करण्यासाठी भाजपा अक्षय कुमारला निवडणूकीच्या रिंगणात उतरवू शकतो. Lok Sabha Election 2019 Dates: महाराष्ट्रात चार टप्प्यांमध्ये मतदान होणार, पहा एप्रिल महिन्यात कोणत्या चार दिवशी होणार मतदान?

काही दिवसांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कला, राजकारण, संगीत, क्रीडा या क्षेत्रातील नामवंतांना टॅग करून त्यांना 'अधिकाधिक मतदारांना यंदा मतदान करण्यासाठी प्रोत्साहीत करा' असे आवाहन केले होते. त्यानंतर अक्षय कुमारनेही ट्विट करत लोकशाहीला बळकटी देण्यासाठी अधिकाधिक मतदारांचा सहभाग वाढवणं गरजेचे आहे. देश आणि मतदारांमध्ये एक सुपरहीट प्रेमकथा असेल असे त्याने ट्विटमध्ये म्हटले आहे.

अक्षय कुमारचं ट्विट

देशामध्ये 11 एप्रिल ते 19 मे 2019 या कालावधीमध्ये मतदान होणार आहे. हे मतदान सात विविध टप्प्यात होईल तर मतमोजणी 23 मे 2019 दिवशी होईल.