Uttar Pradesh: उत्तर प्रदेशात चायनीज मांझा (Chinese Manjha) गळ्यात अडकल्याने दुचाकीस्वार कॉन्स्टेबल मृत्यू झाला आहे. शाहरुख हसन असं या कॉन्स्टेबलचं नाव असून ते एसपी कार्यालयातील अभियोजन कक्षात तैनात होते. अमरोहाचा रहिवासी असलेला पोलीस हवालदार शाहरुख हसन काही कामासाठी पोलीस लाईनवरून दुचाकीवरून जात असताना चौक कोतवाली परिसरातील अजीजगंज येथे एक चिनी मांझा त्याच्या गळ्यात अडकला. त्यामुळे त्याचा गळा चिरला गेला. त्यानंतर ते दुचाकीवरून रस्त्यावर पडले. जवळच्या लोकांनी त्याला ताबडतोब शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात नेले, जिथे डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.
चिनी मांझा गळ्यात अडकला -
घटनास्थळी उपस्थित असलेल्या लोकांनी सांगितले की, शाहरुख त्याच्या बाईकवरून जात असताना त्यांचा गळा मांझाने कापला. काही सेकंदातच त्यांचा मृत्यू झाला. अतिरिक्त पोलिस अधीक्षक (शहर) संजय कुमार सागर यांनी पीटीआयला सांगितले की, शनिवारी कोतवाली पोलिस स्टेशन हद्दीतील अझीझगंज येथे मोटारसायकल चालवणाऱ्या पोलिस कॉन्स्टेबल शाहरुख खान (28) यांच्या गळ्यात चिनी मांझा अडकला. त्याला गंभीर अवस्थेत सरकारी वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले होते. मांझाने त्याची मान कापण्यात आली होती. उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. (हेही वाचा -Nylon Kite String Slashes Throat: नायलॉन मांजाने कापला गळा, दुचाकीस्वाराचा मृत्यू; मेरठ येथील घटना)
दरम्यान, घटनेची माहिती मिळताच, डीएम धर्मेंद्र प्रताप सिंह आणि एसपी राजेश एस यांनी शहर दंडाधिकारी आणि इतर अधिकाऱ्यांसह जिल्हा रुग्णालयात पोहोचून घटनेची माहिती घेतली. जिल्हा दंडाधिकाऱ्यांनी सांगितले आहे की, विशेष मोहीम राबवून चिनी धागा विकणाऱ्यांवर कडक कारवाई केली जाईल. त्यांनी लोकांना पतंग उडवण्यासाठी कोणत्याही प्रकारे चिनी दोरी वापरू नये आणि त्याची खरेदी-विक्री करू नये, असे आवाहनही केले आहे. (हेही वाचा, Mumbai News: मुंबईत मांजामुळे एकीकडे तरुणाचा बळी, तर दुसरी कडे महिलेची हनुवटी कापली)
ऑनलाइन विकला जातोय चायनीज मांझा -
पोलिसांच्या कारवाईनंतर व्हॉट्सअॅप आणि टेलिग्रामवर चिनी मांजाची विक्री सुरू झाली आहे. मकर संक्रांतीमुळे पतंगवाले ऑनलाइन दोरी विकत असल्याचे सांगितले जात आहे. मात्र, याबाबत अद्याप पोलिसांना कोणतीही तक्रार मिळालेली नाही. मकर संक्रांतीला लोक मोठ्या संख्येने पतंग उडवतात. मात्र, या चायनीय मांझामुळे अनेक ठिकाणी अपघात घडल्याच्या घटना यापूर्वी घडल्या आहेत.