Pneumonia Cases in AIIMS Delhi: अनेक मीडिया रिपोर्ट्समध्ये चीन (China) मध्ये कहर करणाऱ्या न्यूमोनिया (Pneumonia) बॅक्टेरियाची प्रकरणे दिल्लीत (Delhi) सापडल्याचा दावा करण्यात येत आहे. मात्र, हा दावा आता दिल्ली एम्सने (AIIMS Delhi) फेटाळला आहे. दिल्लीतील एम्स रुग्णालयाने एक निवेदन जारी करून हे स्पष्ट केले आहे की, एम्समध्ये दाखल असलेल्या कोणत्याही न्यूमोनिया रुग्णाचा चीनमध्ये आढळलेल्या न्यूमोनिया विषाणूशी (Pneumonia Virus) कोणताही संबंध नाही.
सोशल मीडियावर दिशाभूल करणाऱ्या पोस्ट -
सध्या सुरू असलेल्या मीडिया रिपोर्ट्सवर एक निवेदन जारी करताना एम्सने म्हटले आहे की, दिल्ली एम्समधील न्यूमोनियाच्या प्रकरणांना चिनी बॅक्टेरियाशी जोडणारे मीडिया रिपोर्ट्स दिशाभूल करणारे आणि चुकीचे आहेत. मायकोप्लाझ्मा हा सर्वात सामान्य न्यूमोनिया निर्माण करणारा जीवाणू आहे. जो भारतात आढळतो. त्याचा चीनमधील अलीकडील प्रकरणांशी त्याचा संबंध नाही. (हेही वाचा -China Faces Travel Ban: चीनवर प्रवास बंदी घालण्याची तयारी? अमेरिकेत मुलांमध्ये श्वासोच्छवासाचे आजार पसरल्यानंतर करण्यात आली मागणी)
मायकोप्लाझ्मा न्यूमोनियाची सात प्रकरणे -
ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस (एम्स) मध्ये मायकोप्लाझ्मा न्यूमोनियाची सात प्रकरणे नोंदवली गेली आहेत. ही प्रकरणे यावर्षी एप्रिल ते सप्टेंबर दरम्यान उघडकीस आली. मात्र, ते चिनी जीवाणूंशी संबंधित असल्याचा अहवालात केलेला दावा पूर्णपणे चुकीचा आहे. (हेही वाचा - China H9N2 Outbreak: चीनमधील H9N2 चा प्रादुर्भाव; भारताला धोका कमी, लहान मुलांमधील वाढत्या श्वसन आजारावर केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे बारीक लक्ष)
Media reports claiming detection of bacterial cases in AIIMS Delhi linked to the recent surge in Pneumonia cases in China are misleading and inaccurate. Mycoplasma pneumonia is the commonest bacterial cause of community-acquired pneumonia. Pneumonia Cases in AIIMS Delhi have no… pic.twitter.com/rZkpgPEwv1
— ANI (@ANI) December 7, 2023
मायकोप्लाझ्मा न्यूमोनियाची लक्षणे -
दिल्लीतील एम्स रुग्णालय मायकोप्लाझ्मा न्यूमोनियाच्या प्रसारावर लक्ष ठेवणाऱ्या जागतिक संघाचा एक भाग आहे. मायकोप्लाझ्मा न्यूमोनिया संसर्गाच्या लक्षणांमध्ये दीर्घकाळ घसा खवखवणे, थकवा, ताप, खोकला यांचा समावेश होतो. चीनमध्ये हा संसर्ग झपाट्याने पसरत आहे.