Jawaharlal Nehru Death Anniversary: माजी पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू (Former PM Jawaharlal Nehru) यांची आज 60 वी पुण्यतिथी(Death Anniversary)आहे. त्यानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी माजी पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांना आदरांजली अर्पण केली. पंतप्रधान मोदींनी त्यांच्या एक्स अकाऊंटवर ट्विट करत श्रद्धांजली अर्पण केली. 'माजी पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू जी यांना त्यांच्या पुण्यतिथीनिमित्त मी आदरांजली', असे ट्वीट मोदींनी केले आहे. त्याशिवाय काँग्रेसच्या सर्व नेत्यांकडून जवाहरलाल नेहरू यांना आदराजली अर्पण करण्यात येत आहे. शांतीवन येथे त्यांच्या स्मारकावर सर्व काँग्रेस कार्यकर्ते हजेरी लावत आहेत. (हेही वाचा:MLA P. N. Patil Dies: काँग्रेसचे निष्ठावंत आमदार पी. एन. पाटील यांचे निधन; मृत्यूशी झुंज ठरली अपयशी)
I pay homage to former PM Pandit Jawaharlal Nehru Ji on his death anniversary.
— Narendra Modi (@narendramodi) May 27, 2024
जवाहरलाल नेहरू 1947 मध्ये स्वातंत्र्यानंतर भारताचे पहिले पंतप्रधान बनले. भारताच्या स्वातंत्र्यलढ्यात जवाहरलाल नेहरूंचा मोठा वाटा होता. 27 मे 1964 रोजी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. 1947 ते 1964 पर्यंत ते वयाच्या 74 व्या वर्षी निधन होईपर्यंत ते पंतप्रधान होते. त्यांना मुलांबद्दल खूप प्रेम होते आणि मुले त्यांना चाचा नेहरू म्हणत होते. त्यांच्या स्मरनार्थ १४ नोव्हेंबर भारतात दरवर्षी बालदिन म्हणूनही साजरा केली जातो.