MLA P. N. Patil : काँग्रेसचे करवीर विधानसभा मतदारसंघाचे आमदार पी. एन. पाटील (P. N. Patil ) यांचं आज गुरूवारी दुखद निधन झालं आहे. 4 दिवसांपूर्वी ते बाथरुममध्ये पाय घसरून पडले होते. त्यानंतर गेल्या 4 दिवसांपासून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू होते. मात्र, उपचार सुरू असताना त्यांची मृत्यूशी झूंज अपयशी ठरली. आज पहाटे वयाच्या 71 व्या वर्षी पी. एन. पाटील यांनी अखेरचा श्वास घेतला आहे. आमदार सतेज पाटील यांनी सोशल मिडीयावर पोस्ट करत याबाबत माहिती दिली.बाथरूममध्ये घसरून पडल्यामुळे पी. एन. पाटील यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली होती. मेंदूमध्ये रक्तस्त्राव झाला होता. (हेही वाचा: Mukhtar Ansari Death: मुख्तार अन्सारी यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन; बांदा मेडिकल कॉलेजमध्ये घेतला अखेरचा श्वास)
लोकसभा निवडणुकीसाठी कोल्हापूर पी. एन. पाटील यांच्या नावाचीही चर्चा होती. मात्र, वय आणि प्रकृती लक्षात घेत त्यांनी निवडणूक लढवण्यास नकार दिला होता. त्यामुळे काँग्रेसने शाहू महाराज यांना उमेदवारी दिली. एन. पी पाटील यांनी शाहू महाराजांच्या प्रचारासाठी कोणतीच कसर ठेवली नव्हती. त्यामुळे कदाचीत त्यांना थकवा जाणवत होता. परिणामी काही दिवस ते घरातच विश्रांती घेत होते. त्यातच पाटील यांना रक्तदाबाचा त्रास सुरू झाला. गेल्या शनिवारी १८ मे रोजी रात्री डॉक्टरांनी त्यांना सलाईन लावली होती. रविवारी सकाळी पाटील हे बाथरुममध्ये चक्कर येऊन पडले.
काँग्रेसचे निष्ठावंत, कोल्हापूर जिल्हा काँग्रेसचे माजी अध्यक्ष, करवीर विधानसभा मतदारसंघाचे आमदार पी. एन. पाटील यांच्या निधनाची वार्ता अत्यंत दुःखद आहे. त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली. आम्ही त्यांच्या कुटुंबियांच्या दुःखात सहभागी आहोत.
त्यांच्यासारख्या निष्ठावंत नेत्याच्या… pic.twitter.com/GJkdmm4txE
— Satej (Bunty) D. Patil (@satejp) May 23, 2024
त्यामुळे त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. पी. एन पाटील यांना उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. ते रुग्णालयात दाखल झाल्याचं समजताच जिल्ह्यातील कानाकोपर्यातून काँग्रेस कार्यकर्ते रुग्णालयाच्या आवारात दाखल झाले होते.