PM Modi Interacts With Indian Athletes (PC - X/@narendramodi)

PM Modi Interacts With Indian Athletes: पॅरिस ऑलिम्पिक 2024 (Paris Olympics 2024) 26 जुलैपासून सुरू होत आहे. ऑलिम्पिकमध्ये सहभागी होणारे भारतीय खेळाडू देशाला अभिमानास्पद वाटतील आणि 140 कोटी लोकांच्या अपेक्षा पूर्ण करतील, असा विश्वास पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra MOdi) यांनी व्यक्त केला आहे. पॅरिस ऑलिम्पिक (Paris Olympics) साठी भारत सुमारे 120 खेळाडूंची तुकडी पाठवत आहे. हे खेळाडू यावेळी पॅरिस ऑलिम्पिकमध्ये टोकियो ऑलिम्पिकपेक्षा चांगली कामगिरी करतील.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ऑलिम्पिकमध्ये सहभागी झालेल्या खेळाडूंची भेट घेतली. पंतप्रधान नरेंद्र मोदी खेळाडूंशी संवाद साधताना सांगितलं की, 'मला विश्वास आहे की आमचे खेळाडू त्यांचे सर्वोत्तम देतील आणि भारताचा गौरव करतील. त्यांचा जीवन प्रवास आणि यश 140 कोटी भारतीयांना आशा देते.' दरम्यान, पीएम मोदींनी नीरज चोप्रा यांना त्याच्या आईने बनवलेला चुरमा कधी खाऊ घालतील? असा प्रश्न विचारला. तेव्हा नीरज चोप्रा म्हणाला, हो सर, लवकरच हरियाणातून चुरमा घेऊन येणार आहे. (हेही वाचा -PM Modi Meets Team India: पंतप्रधान मोदींनी भारतीय क्रिकेट संघाच्या खेळाडूंची त्यांच्या दिल्लीतील निवासस्थानी भेट घेतली, विराट कोहलीने मानले आभार (See Post))

पहा व्हिडिओ - 

टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारताने 7 पदके जिंकली -

यावेळी क्रीडा मंत्री मनसुख मांडविया, क्रीडा राज्यमंत्री रक्षा खडसे आणि भारतीय ऑलिम्पिक संघटनेच्या अध्यक्षा पीटी उषा यांच्यासोबत भारतीय खेळाडूंची तुकडी उपस्थित होती. मोदींनी नीरज चोप्रा, बॉक्सर निखत जरीन आणि दोन वेळा ऑलिम्पिक पदक विजेती बॅडमिंटनपटू पीव्ही सिंधू यांच्याशी आभासी संभाषण केले. नीरज चोप्राने भालाफेकमध्ये मिळवलेल्या सुवर्णपदकासह टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारताने सात पदके जिंकली होती. जी भारताची ऑलिम्पिकमधील सर्वोत्तम कामगिरी आहे.