PM Modi inaugurates New Nalanda University Campus: पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi)यांनी बिहारमधील राजगीर येथे नालंदा विद्यापीठ(Nalanda University)च्या नवीन कॅम्पसचे उद्घाटन केले. उद्घाटन समारंभाला 17 देशांतील राजदूत यांसह अनेक मान्यवर लोक उपस्थित होते. कॅम्पसमध्ये 40 वर्गआहेत. ज्याची एकूण आसनक्षमता सुमारे 1900 आहे. यात 300 आसनक्षमतेची दोन ऑडिटोरियम हॉल आहेत. 2016 मध्ये या साइटला यूएन हेरिटेज साइट(UN Heritage Site) घोषित करण्यात आले. नवीन कॅम्पस 1,749 कोटी रुपये खर्चून बांधले आहे. (हेही वाचा:International Yoga Day 2024: पंतप्रधान मोदी यांच्याकडून उष्ट्रासन योग आसनाचा व्हिडीओ शेअर; शारिरीक जडणघडणीत योगाचे महत्त्व केले अधोरेखीत )
पोस्ट पाहा-
It’s a very special day for our education sector. At around 10:30 AM today, the new campus of the Nalanda University would be inaugurated at Rajgir. Nalanda has a strong connect with our glorious past. This university will surely go a long way in catering to the educational needs… pic.twitter.com/sJh6cndEve
— Narendra Modi (@narendramodi) June 19, 2024
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्राचीन नालंदा विद्यापीठाला भेट दिली. तेथे असलेल्या विद्यापीठांच्या अवशेषांची पाहणी केली. नालंदा विद्यापीठाच्या नवीन कॅम्पसचे उद्घाटन करण्यात आले आहे.
'शिक्षण क्षेत्रासाठी हा खूप खास दिवस आहे. नालंदाचा आपल्या गौरवशाली भारताशी मजबूत संबंध आहे. तरुणांच्या शैक्षणिक गरजा पूर्ण करण्यासाठी हे विद्यापीठ नक्कीच खूप पुढे जाईल,” असे पंतप्रधान मोदींनी X वर लिहिले.
नालंदाच्या पुरातत्व स्थळामध्ये प्रसिद्ध मठ आणि शैक्षणिक केंद्राचे अवशेष आहेत. या कॉम्प्लेक्समध्ये स्तूप, देवस्थान आणि विहारांसह विविध संरचना आहेत. ज्या निवासी आणि शैक्षणिक सुविधा म्हणून काम करतात. याव्यतिरिक्त, साइट दगड आणि धातू वापरून तयार केलेल्या कलेच्या महत्त्वपूर्ण कार्यांचे प्रदर्शन करते. ५व्या शतकात स्थापन झालेले नालंदा विद्यापीठ हे जगभरातील विद्वानांसाठी एक प्रसिद्ध स्थळ होते. १२ व्या शतकात आक्रमणकर्त्यांनी नालंदा विद्यापीठ उद्ध्वस्त केले.