कोरोनाचा संसर्ग झाल्यानंतर गंभीर प्रकृती असलेल्या रुग्णांसाठी प्लाझ्मा उपचार पद्धती (Plasma Therapy) प्रभावशाली नसल्याचे संशोधनात आढळून आले आहे. यामुळे कोरोना उपचारातून प्लाझ्मा पद्धत वैद्यकीय मार्गदर्शक तत्त्वांमधून काढून टाकण्याची शक्यता आहे. नुकतीच भारतीय वैद्यकीय संशोधन परिषद-राष्ट्रीय टाक्स फोर्सच्या बैठक पार पडली. या बैठकीत प्रौढ रूग्णांच्या उपचार व्यवस्थापनाशी संबंधित वैद्यकीय मार्गदर्शक सूचनांमधून प्लाझ्मा पद्धतीचा वापर काढून घेण्याच्या बाजूने सर्व सदस्य होते. हे कोरोना प्रभावी नसल्याचे कारण देण्यात आले आहे. तसेच बऱ्याच बर्याच बाबतीत हे अयोग्यरित्या वापरले गेल्याचे सांगितले आहे.
आयसीएमआर लवकरच या संदर्भात सल्लामसलत करेल. सध्याच्या मार्गदर्शक सूचनांनुसार लक्षणे दिसल्यानंतर सात दिवसांच्या आत रोग मध्यम पातळीच्या सुरुवातीच्या टप्प्यात आणि तेथे गरजू प्लाझ्मा दाता उपस्थित असल्यास प्लाझ्मा पद्धतीचा वापर करण्यास परवानगी आहे. हे देखील वाचा- Mucormycosis चेहरा, नाक, डोळे, मेंदूवर परिणाम करू शकतो; स्टेरॉईडचा गैरवापर हे या रोगामागील मुख्य कारण- Dr. Randeep Guleria
ट्वीट-
Plasma therapy most likely to be dropped from clinical management guidelines on #COVID19. Final decision to be taken: Sources
— ANI (@ANI) May 15, 2021
केंद्रीय वैद्यकीय सल्लागार डॉ. विजय राघवन यांच्यासह भारतीय वैद्यकीय संशोधन परिषद अर्थात आयसीएमआर आणि दिल्लीतील एम्स संचालकांना लिहिलेल्या पत्रात धोक्याचा इशारा देण्यात आला आहे. “भारतात प्लाझ्माचा अवैज्ञानिकपणे आणि अतार्किकपणे वापर केला जात असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
आयसीएमआरचे प्रमुख बलराम भार्गव आणि एम्सचे संचालक रणदीप गुलेरिया यांनाही हे पत्र पाठविण्यात आले आहे. यामध्ये सार्वजनिक आरोग्य व्यावसायिकांनी असे म्हटले आहे की, प्लाझ्मा सिस्टमवरील सद्य मार्गदर्शक तत्त्वे विद्यमान पुराव्यांच्या आधारे नाहीत.