Image For Representation (Photo credit: IANS)

Petrol-Diesel Price Today: कोरोना महामारीच्या काळात सर्वसामान्यांच्या अडचणीं कमी होण्याचं नाव घेताना दिसत नाहीत. वाढत्या महागाईमुळे त्यांच्या समस्या वाढल्या आहेत. पेट्रोल-डिझेलच्या किंमती (Petrol-Diesel Price Today) आज पुन्हा वाढल्या आहेत. दरम्यान, तेल कंपन्यांनी पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत सलग 11 व्या दिवशी वाढ केली आहे. ज्यामुळे राजधानी दिल्लीत पेट्रोल प्रतिलिटर 90 रुपयांच्या पुढे गेले आहे. सध्या अनेक शहरांत पेट्रोलचे दर शंभरच्या पुढे गेले आहेत.

राजधानी दिल्लीमध्ये पेट्रोलच्या दरात 31 पैसे आणि डिझेलच्या दरात प्रतिलिटर 33 पैशांची वाढ झाली आहे. सध्या देशात पेट्रोल विक्रमी उच्चांकावर पोहोचले आहे. दुसरीकडे, प्रीमियम पेट्रोल अनेक शहरांमध्ये यापूर्वी प्रति लिटर 100 रुपयांमध्ये उपलब्ध आहे. आजच्या वाढीनंतर दिल्लीत पेट्रोल 90.19 रुपये आणि डिझेल 80.60 रुपयांना विकले जात आहे. (वाचा - Air Pollution in Delhi: धक्कादायक! राजधानी दिल्लीमध्ये 2020 मध्ये वायू प्रदूषणामुळे तब्बल 54 हजार लोकांचा मृत्यू)

आर्थिक राजधानी मुंबईत पेट्रोल 96.62 रुपये आणि डिझेल 87.67 रुपये प्रति लिटर, चेन्नईमध्ये पेट्रोल 92.25 आणि डिझेलला प्रति लिटर 85.63 रुपये मिळत आहे. कोलकातामध्ये पेट्रोल 91.41 रुपये प्रति लिटर आणि डिझेल 84.19 रुपये प्रति लिटरला विकले जात आहे. उत्तर प्रदेशच्या नोएडामध्ये पेट्रोल 91.14 आणि डिझेल 88.62 रुपये प्रतिलिटरपर्यंत पोहोचले आहेत.