Petrol-Diesel Price | Image Used For Representational purpose Only (Photo Credits: Pixabay.com)

Petrol-Diesel Price Today: पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांनंतर इंधनाच्या किंमती दिवसेंदिवस वाढत आहेत. तेल कंपन्यांनी रविवारी पुन्हा एकदा पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ केली. गेल्या 13 दिवसांत पेट्रोल आणि डिझेलच्या दरात 11 वेळा वाढ करण्यात आली आहे. राष्ट्रीय राजधानी दिल्लीत 22 मार्चपासून पेट्रोल 8 रुपयांनी महागले आहे. तब्बल चार महिन्यांच्या कालावधीनंतर तेल कंपन्यांनी पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ करण्यास सुरुवात केली आहे.

दिल्लीत रविवारी पेट्रोल आणि डिझेल प्रतिलिटर 80 पैशांनी महागले. पेट्रोलचा दर आता 103.41 रुपये प्रति लिटर आणि डिझेलचा दर 94.67 रुपये प्रति लिटर झाला आहे. त्याचवेळी मुंबईत पेट्रोलचा दर प्रतिलिटर 118.41 रुपये आणि डिझेलचा दर 102.64 रुपयांवर पोहोचला आहे. कोलकात्यात पेट्रोलचा दर प्रतिलिटर 113.03 रुपये आणि डिझेलचा दर 97.82 रुपये प्रति लिटर झाला आहे. चेन्नईमध्ये पेट्रोलचा दर प्रति लिटर 108.96 रुपये आणि डिझेलचा दर 99.04 रुपये प्रति लिटर झाला आहे. (हेही वाचा - Ramzan 2022 Wishes: पंतप्रधान मोदींनकडून रमजानच्या शुभेच्छा, म्हणाले- हा पवित्र महिना समाजात शांतता, सौहार्द आणि करुणेची भावना अधिक वाढवो)

तज्ज्ञांच्या मते, पुरवठ्याच्या संकटामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीत लक्षणीय वाढ झाली आहे. त्यामुळे त्याचा परिणाम देशांतर्गत बाजारावरही झाल्याचे मानले जात आहे. नोव्हेंबर 2021 मध्ये केंद्र सरकारने पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीवर आकारणी करण्यासाठी उत्पादन शुल्कात कपात केली होती. त्यानंतर त्यांच्या किमती स्थिर होत्या. मात्र, रशिया आणि युक्रेनमध्ये सुरू असलेल्या युद्धामुळे परिस्थिती बदलली आणि कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी वाढ झाली. भारत कच्च्या तेलाचा मोठा आयातदार आहे आणि अशा स्थितीत जागतिक बाजारातील गोंधळाचा देशांतर्गत बाजारावर लक्षणीय परिणाम होतो.