Petrol-Diesel Price Today: आंतरराष्ट्रीय बाजारात आज कच्च्या तेलाचे दर मंदावले आहेत. देशांतर्गत बाजारपेठेत तेल विपणन कंपन्यांनी पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या किंमतीला आज 13 व्या दिवशी ब्रेक लावला आहे. शनिवारी दिल्लीत पेट्रोल 39 पैसे आणि डिझेल 37 पैशांनी महागले. दिल्लीत पेट्रोल 90.58 रुपये प्रतिलिटर आणि डिझेल 80.97 रुपये प्रति लिटर आहे. त्यानंतर आज देशभरात पेट्रोल आणि डिझेलचे दर स्थिर आहेत.
देशभरात गेल्या 12 दिवसांपासून पेट्रोल-डिझेलच्या दरात दररोज वाढ होत आहे. देशातील सर्व मेट्रो शहरांमध्ये पेट्रोल-डिझेलचे दर ऑलटाइम उच्च किंमतीपर्यंत पोहोचले आहेत. 2021 मध्ये पेट्रोल 6.46 रुपयांनी महाग झाले आहे. तथापि, जानेवारी आणि फेब्रुवारीमध्ये पेट्रोल आणि डिझेलचे दर अवघ्या 24 दिवसात वाढले. त्याचबरोबर या 24 दिवसांत डिझेल प्रति लिटर 06.77 रुपयांनी महाग झाले. गेल्या 10 महिन्यांत त्याची किंमत सुमारे 17 रुपयांनी वाढली आहे. (वाचा - Electric Vehicles: सर्व सरकारी अधिकाऱ्यांसाठी इलेक्ट्रिक वाहनांचा वापर अनिवार्य करावा- मंत्री नितीन गडकरी)
आपल्या शहरातील तेलाची किंमत जाणून घ्या -
आज 21 फेब्रुवारी रोजी दिल्लीत पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत कोणताही बदल झालेला नाही. त्यामुळे पेट्रोलचे प्रति लिटर 90.58 रुपये तर डिझेल 80.97 रुपये प्रति लिटर दराने विकले जात आहेत. मुंबईतही पेट्रोल-डिझेलचे दर स्थिर आहेत. काल पेट्रोलची किंमत प्रतिलिटर 97.00 रुपये तर डिझेलची किंमत 88.06 रुपये प्रति लिटर होती. आज ही किंमत कायम आहे.
याशिवाय कोलकातामध्ये पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत कोणताही बदल झालेला नाही. त्यामुळे शहरात पेट्रोलचा दर प्रति लिटर 91.78 रुपये आणि डिझेलचा दर 84.56 रुपये आहे. तसेच चेन्नईमध्येही पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ झालेली नाही. पेट्रोलचे दर प्रति लीटर 92.59 रुपये तर डिझेलचे दर 85.98 रुपये प्रतिलिटर आहेत. बेंगळुरूमध्येदेखील पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती वाढलेल्या नाहीत. पेट्रोलचे दर प्रतिलिटर 93.61 आणि डिझेलचे दर 85.84 रुपये आहेत.