Petrol and Diesel Prices in India on June 20, 2021: कोरोना महामारीमुळे आर्थिक संकटात सापडलेल्या लोकांना आता महागाईचा सामना करावा लागत आहेत. देशात दिवसेंदिवस इंधनाच्या दरात वाढ (Fuel Price) होताना दिसत आहे. मार्च-एप्रिलमध्ये इंधन दरामध्ये जास्त दरवाढ झाली नाही. परंतु, जून महिन्यातील इंधनदरवाढीमुळे नागरिकांना चिंतेत टाकले आहे. मुंबई (Mumbai), दिल्लीसह (Delhi) इतर प्रमुख शहरात पेट्रोल (Petrol) आणि डिझेल (Diesel) विक्रमी दराने विकले जात आहेत. या प्रमुख शहरांतील इंधनाचे दर जाणून घेण्यासाठी खालील माहिती फायदेशीर ठरणार आहे.
इंधनदरवाढीच्या ताज्या आकडेवारीनुसार, दिल्लीत पेट्रोलची किंमत 97.22 रुपये प्रति लीटर करण्यात आली आहे. त्याचबरोबर डिझेल प्रति लिटर 87.97 रुपये झाले आहे. मुंबईत विक्रमी वाढ झाली आहे. मुंबईत पेट्रोल 103.36 रुपये प्रतिलिटर तर, डिझेल 95.44 रुपये प्रतिलिटर विकले जात आहे. कोलकातामध्ये पेट्रोलची किंमत 97.12 रुपये तर, डिझेलची किंमत 90.82 रुपये प्रतिलिटर झाली आहे. चेन्नईमध्ये पेट्रोल 98.40 रुपये प्रति लिटर आणि डिझेल 92.58 रुपये प्रति लिटर विकले जात आहे. हे देखील वाचा- SBI ग्राहकांसाठी महत्वाची बातमी! खातेधारकांनी 10 दिवसात 'हे' करा महत्वाचे काम
देशात दररोज पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती क्रूड तेलाच्या किंमती आणि परकीय चलन दरानुसार बदलत असतात. हे नवीन दर देशातील प्रत्येक पेट्रोल पंपावर दररोज सकाळी 6 वाजेपासून लागू होतात. ज्यामुळे देशातील इंधानाच्या दरात दररोज सकाळी 6 सुधारणा होते. दरम्यान, मोबाईच्या माध्यमातूनही इंधानाचे ताजे दर जाणून घेता येतात. यासाठी इंडियन ऑइल एसएमएस सेवेअंतर्गत आपण 9224992249 या मोबाइल क्रमांकावर एसएमएस पाठवू शकता. त्यासाठी RSP <स्पेस> पेट्रोल पंप डीलर कोड टायप करून पाठवावा लागेल.