नरेंद्र मोदींकडे मागितली पत्नीचा खून करून अंत्यसंस्कार करण्यासाठी दोन दिवसांची सुट्टी
प्रातिनिधिक प्रतिमा (Photo Credits: PTI)

बिहार : आजारपण, प्रवास, घरातील कार्ये अशा अनेक गोष्टींसाठी लोक कार्यालयातून सुट्ट्या घेतात. बिहारच्या एका व्यक्तीने चक्क बायकोचा खून करून तिचे अंत्यसंस्कार करण्यासाठी सुट्टी मागितली आहे. आपल्या सुट्टीचा अर्ज त्याने वरिष्ठांना पाठवला, मात्र तो मान्य केला गेला नाही. त्यानंतर या पट्ठ्याने हा अर्ज चक्क पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पाठवला. बिहारच्या बकसड़ा (Baksada) या गावात ही घटना घडली आहे. पतीने लिहिलेला हा अर्ज सोशल मिडियामध्ये आता चांगलाच व्हायरल झाला आहे.

मुन्ना प्रसाद हे दक्षिण बिहार ग्रामीण बँकेच्या बकसड़ा गावात कार्यरत आहेत. त्यांच्या पत्नी किडनीच्या आजाराने ग्रस्त आहे. पत्नीच्या उपचारासाठी त्यांना सुट्टी दिली जात नाही, त्यामुळे त्यांनी हे पाऊल उचलले आहे. सुट्टीसाठी तगादा लावल्याने चिडून वरिष्ठांनी ‘आता फक्त बायकोच्या अंत्यसंस्कारासाठीच सुटते मिळेल असे सांगितले’. त्यांनतर चिडलेल्य मुन्ना यांनी बँकेच्या पटना येथील मुख्य कार्यालयात तसेच पंतप्रधान यांना रजेचा अर्ज पाठवला. या पत्रात त्यांनी लिहिले होते की, मला माझ्या पत्नीचा खून करून तिच्यावर अंतिम संस्कार करण्यासाठी फक्त दोन दिवसांची सुट्टी द्या. अशा आशयाचे पत्र पाहून त्यांची सुट्टी तत्काळ मंजूर करण्यात आली आहे. (हेही वाचा : मुंबई: सेक्स करण्यास नकार दिल्याने मॉडेलची हत्या, मानसी दीक्षित खून प्रकरणात धक्कादायक खुलासा

सुट्टीसाठी बँक अधिकारी, मुख्यमंत्री, मानवाधिकार आयोग आणि राष्ट्रपतींकडे बँक मॅनेजरने रजा अर्ज पाठवला होता. मुन्ना यांची पत्नी किडनीच्या रोगाशी झुंज देट आहे. तिचे आठवड्यातून दोन दिवस डायलिसिस करावे लागते. क्षेत्रीय अधिकारी फोन उचलत नाहीत, बँकेतील अधिकारी रजा देत नाहीत त्यामुळे त्यांनी ही नामी शक्कल लढवली. बँक अधिकाऱ्यांनीही या प्रकरणी ही चिंतेची बाब असल्याचे म्हटले आहे. सुट्टी मंजूर झाल्यावर ग्रामीण बँकेच्या जिल्हा समन्वयकांनी संबंधित कर्मचारी सुट्टीनंतर कामावर हजर झाला असल्याचे सांगितले आहे.