Coronavirus: 65 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या व्यक्तींना तसेच गरोदर महिलांना (Pregnant Women) आणि 10 वर्षापेक्षा कमी वयाच्या मुलांना घराबाहेर पडता येणार नाही, असे निर्देश अतिरिक्त मुख्य सचिव गृह अवनीश अवस्थी (Additional Chief Secretary Home Awanish Awasthi) यांनी दिले आहेत. कोरोनाचा संसर्गाच्या पार्श्वभूमीवर हा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे.
वृद्ध तसेच गर्भवती महिला आणि लहान मुलांना कोरोनाची लवकर लागण होते. त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून त्यांना घराबाहेर न पडण्याचे आदेश दिले आहेत. सध्या देशात कोरोना बाधितांचा आकडा झपाट्याने वाढत आहे. गेल्या 24 तासांत भारतात 2487 नव्या कोरोना रुग्णांची भर पडली आहे. तसेच 83 जणांचा कोरोनामुळे बळी गेला आहे. (हेही वाचा - Corona Update In India Today: भारतात कोरोना विषाणूचा हाहाकार; देशात आज 2 हजार 487 नव्या रुग्णांची नोंद तर, एकूण 83 जणांचा मृत्यू)
65 वर्ष से अधिक आयु के व्यक्ति या किसी बीमारी से ग्रस्त व्यक्ति, 10 साल से कम उम्र के बच्चे और गर्भवती महिलाओं को घर से बाहर नहीं निकलने का निर्देश दिया गया है :अतिरिक्त मुख्य सचिव गृह अवनीश अवस्थी pic.twitter.com/2f3XwJlegQ
— ANI_HindiNews (@AHindinews) May 3, 2020
देशात आतापर्यंत 1306 लोकांना कोरोनामुळे आपला जीव गमवावा लागला आहे. तसेच आतापर्यंत एकूण 40 हजार 263 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने यासंदर्भात माहिती दिली आहे. कोरोना रुग्णांच्या वाढत्या संख्येमुळे नागरिकांमध्ये भितीजनक वातावरण निर्माण झाले आहे. कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव पाहता सरकारकडून युद्धपातळीवर प्रयत्न करण्यात येत आहेत.