Madhya Pradesh: भंवरकुआन पोलिस स्टेशन हद्दीतील अॅपल हॉस्पिटलमध्ये शुक्रवारी चुकीच्या उपचारामुळे एका वृध्द रुग्णाचा मृत्यू झाला. या घटनेनंतर नातेवाईकांनी हॉस्पिटलच्या परिसरात गोंधळ घातला. या घटनेनंतर मृताच्या नातेवाईकांनी हॉस्पिटलमधील डॉक्टराच्या निष्काळजीपणाने रुग्णाचा मृत्यू झाल्याचे सांगितले. ही मन हेलावून टाकणारी घटना मध्य प्रदेशातील इंदौर शहरातील आहे. (हेही वाचा- पतीने घेतलेल्या पैशांसाठी विधवा महिलेवर सावकाराचा गोळीबार (Watch Video)
मिळालेल्या माहितीनुसार, रुग्णावर अॅंजिओग्राफी न करता त्याच्या ह्रदया स्टेंट टाकण्यात आल्याने वृध्द रुग्णाचा मृत्यू झाला. धक्कादायक म्हणजे रुग्णाच्या मृत्यूनंतर त्याच्यावर शस्त्रक्रिया करणारे डॉक्टरीही रुग्णालयातून पळून गेले. नातेवाईकांनी घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली. पोलिसांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवेल आहे. पुढील अहवालांचा तपास सुरु आहे,
मृताचे नातेवाईका ऋषभ आणि रिंकू हार्डिया यांनी सांगितले की, गणेश नगर येथील रहिवासी दिनेश मौर्य यांची दुपारी अचाकन प्रकृती खालावली, त्याच्या छातीत दुखत असल्याने त्यांना तात्काळ जवळच्या दवाखान्यात नेलं. त्यानंतर दवाखान्यातून अॅपल रुग्णालयात दाखल केले. रुग्णालयात अँजिओग्राफी करण्याऐवजी स्टेंट टाकला आणि १० मिनिटांत ऑपरेशन संपवले. त्यांना आयसीयूमध्ये हलवण्यात आले.
उपचारादरम्यान त्याच्या मृत्यू झाला. डॉक्टर देवेंद्र चौरासिया यांच्या निष्काळजीपणामुळे रुग्णाचा मृत्यू झाला असा आरोप नातेवाईकांनी केला. घटनेची माहिती मिळताच, पोलिस घटनास्थळी दाखल झाले. नातेवाईकांनी रुग्णालयाच्या परिसरात गोंधळ निर्माण केला.