Indigo Flight: नशेत विमानाचा आपत्कालीन दरवाजा उघडण्याचा केला प्रयत्न, सहप्रवाशांनी केली मारहाण
Indigo Flight (PC - Wikimedia Commons)

इंडिगो फ्लाइटमध्ये (Indigo fLight) बसलेल्या एका प्रवाशाने आपत्कालीन एक्झिट दार हवेतच उघडण्याचा प्रयत्न केला आणि नंतर त्याला अटक करण्यात आली. 180 प्रवाशांसह, फ्लाइट 6E-457 हे गुरुवारी गुवाहाटीहून आगरतळाकडे निघाले होते. विमानाच्या इमर्जन्सी दाराच्या (Emergency Exit) शेजारी बसलेल्या एका व्यक्तीने फ्लाइट मध्यभागी असताना ते उघडण्याचा प्रयत्न केला. त्याच्या शेजारी असलेल्या दुसऱ्या एका प्रवाशाने त्याला थांबवण्याचा प्रयत्न केला पण तो दरवाजा उघडण्याचा प्रयत्न करत राहिला. यानंतर सहप्रवाशांनी या प्रवाशाला मारहाण देखील  केली. विमानामध्ये घडलेल्या प्रकरानंतर विमानात भितीचे वातावरण निर्माण झाले.  मारहाणीचा व्हिडीओ  सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.    (हेही वाचा - Lucknow Shocker: पार्टीत 23वर्षीय तरुणीला गोळी लागल्याने मृत्यू, लखनऊ येथील खळबळजनक घटना)

आरोपीचे नाव बिस्वजीत देबनाथ आहे. तो इंडिगोच्य हैदराबादहून  गुवाहटीला जाणाऱ्या विमानाने अगरतलाचा प्रवास करत होता. विमान जेव्हा लँड होणार होते त्यावेळी तो अचानक दरवाजाच्या दिशेने धावत गेला आणि दरवाजा उघडण्याचा प्रयत्न केला. दरम्यान  फ्लाईट क्रू मेंबर त्याला थांबवले आणि मोठा अनर्थ ठरला. बिस्वजीत देबनाथ फ्लाईटचा दरवाजा उघडण्यासाठी त्या दिशेने गेले त्यावेळी विमानातील एअरहॉस्टेसची नजर त्याच्यावर गेली. एअरहॉस्टेसने लगेच प्रवाशाला पकडले आणि इतर प्रवाशांच्या मदतीने त्याला मागे ओढले.

अगरतळा येथे विमानतळावर पोहचल्यानंतर इंडिगो स्टाफबरोबरच सीआयएसएफ जवानांनी आरोपीला देखील वाचवले आणि एअरपोर्ट पोलिसांच्या ताब्यात दिले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपीला रुग्णालयात दाखल करण्यात आले. सध्या आरोपीची प्रकृती स्थिर आहे. तसेच त्याने अंमली पदार्थाचे सेवन केले होते.