PC-X

Pakistan India Visa Controversy: वैद्यकीय उपचारांसाठी भारतात आलेले पाकिस्तानी नागरिक आज भारत सोडत (Pakistani Passport Holders) आहे. अटारी सीमेवरून सर्व पाकिस्तानी नागरिकांना भारताबाहेर सोडण्यात येत आहे. भारत सोडताना अनेक जण भावूक झाल्याचे आढळले. त्याची चित्रे आयएनएसने शेअर केले आहेत. सोमवारपर्यंत, 537 पाकिस्तानी नागरिकांनी भारत सोडला आहे. तर, एकूण 850 भारतीय पाकिस्तानातून परतले आहेत. जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर, केंद्र सरकारच्या आदेशानुसार पाकिस्तानी नागरिकांची भारत सोडण्याची प्रक्रिया सुरूच आहे. मंगळवारी सकाळी अटारी सीमेवरून मोठ्या संख्येने पाकिस्तानी नागरिक भारतातून परतले.

पाकिस्तानी नागरिकांना देण्यात आलेल्या वैद्यकीय व्हिसाची वैधता आज 29 एप्रिल रोजी संपत आहे. जर मेडिकल व्हिसावर आलेले पाकिस्तानींनी आज भारत सोडला नाहीत तर त्यांना अटक केली जाईल आणि त्यांच्यावर खटला दाखल केला जाईल. त्यांना तीन वर्षांचा तुरुंगवास किंवा तीन लाख रुपये दंड किंवा दोन्ही शिक्षा होऊ शकतात. 25 एप्रिल रोजी भारत सरकारने पाकिस्तानी नागरिकांना देश सोडण्याचे आदेश देणारी नोटीस जारी केली होती. यामध्ये, दीर्घकालीन, राजनयिक आणि अधिकृत व्हिसा वगळता पाकिस्तानी नागरिकांना दिले जाणारे सर्व प्रकारचे व्हिसा 27 एप्रिलपासून रद्द करण्यात आले आहेत.

यापूर्वी, 23 एप्रिल रोजी भारत सरकारने सांगितले होते की, पाकिस्तानी नागरिकांना 14 श्रेणींमध्ये दिलेले व्हिसा रद्द केले जात आहेत. 12 श्रेणीतील व्हिसा धारकांना 25 एप्रिलपर्यंत, सार्क व्हिसा धारकांना 26 एप्रिलपर्यंत आणि वैद्यकीय व्हिसा धारकांना 29 एप्रिलपर्यंत भारत सोडण्यास सांगण्यात आले होते.