खुशखबर: 1 एप्रिलला जमा होणार सन्मान निधी योजनेचा दुसरा हफ्ता
पंतप्रधान नरेंद्र मोदी (Photo Credits: PTI/File)

येणाऱ्या लोकसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेऊन पक्षांनी आपली स्ट्रॅटेजी बदलली आहे. याचाच एक भाग म्हणून गेले इतके महिने मोदी सरकारवार नाराज असलेल्या जनतेला केंद्र सरकारने आपल्या अर्थसंकल्पामधून चांगला दिलासा दिला. शेतकऱ्यांना आणि मध्यमवर्गीय लोकांना डोळ्यासमोर ठेऊन या अर्थसंकल्प तयार करण्यात आला होता. यामध्ये तरतूद केल्याप्रमाणे पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजनेचा पहिला हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाला, आता दुसऱा हप्ता एक एप्रिलला जमा होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी उत्तर प्रदेशातील गोरखपूर मधून PM-KISAN योजनेचा शुभारंभ केला होता.

सन्मान निधी योजनेद्वारे छोट्या शेतकऱ्यांना वर्षाला 6 हजार रुपये देण्यात येणार आहेत. हे सहा हजार शेतकऱ्यांच्या खात्यात थेट जमा होणार आहेत. यासाठी सरकारने 1.2 कोटी शेतकऱ्यांची यादी तयार केली आहे. तीन टप्प्यांमध्ये हे पैसे जमा होणार आहेत. त्यातील पहिला हफ्ता जमा झाल्यानंतर आता 1 एप्रिलला दुसरा हफ्ता जमा होणार आहे. याचसोबत सरकारने असंघटीत कामगारांसाठी पेन्शन योजनादेखील सुरु केली आहे.  15 फेब्रुवारीपासून 18 ते 40 वर्ष वयोगटातील कामगार या योजनेचा लाभ घेऊ शकतील. (हेही वाचा: पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजना: घरबसल्या पाहा तुम्हाला मिळणार का 6,000 रुपये?)

दरम्यान शेतकऱ्यांना हा हफ्ता प्राप्त करण्यासाठी शेतकऱ्यांना आपले आधार कार्ड देणे गरजेचे नाही. अजूनही अनेक शेतकऱ्यांच्या आधार कार्डावरील माहितीमध्ये काही त्रुटी राहिल्या आहेत. त्यामुळे पहिला हफ्ता मिळवण्यासाठी शेतकऱ्यांना अडचणी आल्या होत्या. या गोष्टीचा विचार करून सरकारने अद्जर कार्ड अनिवार्य करण्याचा आपला निर्णय मागे घेतला आहे.