Odisha Road Accident: ओडिसा येथे एक भीषण अपघात झाला आहे. हैद्राबाद येथून बिहार येथे जाणाऱ्या एका पर्यटन लॉरीला धडकली. या अपघातात तीन जणांचा मृत्यू झाला आणि किमान 20 जण जखमी झाले. मयूरभंज जिल्ह्यातील बारीपाडा जवळ राष्ट्रीय महामार्ग 18 वर हा अपघात झाला. बस आणि लॉरीची टक्कर झाली ही टक्कर इतकी भीषण होती की, बसचे अक्षरश: नुकसान झाले आहे. धार्मिक यात्रेसाठी ही बस जात होती. (हेही वाचा- संत ज्ञानेश्वर महाराज पालखी रिंगण सोहळ्यात अपघात, पश्चिम बंगाल येथील फोटोग्राफरचा मृत्यू)
अपघाताची माहिती पोलिसांना देण्यात आली. बसमधील 20 प्रवाशी जखमी झाले. जखमी प्रवाशांना तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले. अपघातानंतर रस्त्यावर बराच वेळ वाहतुक कोंडी झाली होती. हा अपघात बारीपाडा जवळ राष्ट्रीय महामार्ग 18 वर झाला. पोलिसांना या अपघातानंतर बस ताब्यात घेतली. बसमध्ये 23 प्रवाशी प्रवास करत होते.
Three #pilgrims lost their lives and 20 others were injured, some of them critical, when a tourist bus from #Hyderabad headed to Gaya, Bihar rammed into a lorry on NH-18 in #Baripada of #Mayurbhanj dist, #Odisha. All injured hospitalized.#BusAccident #RoadAccident#RoadSafety pic.twitter.com/UE3cz2S6rl
— Surya Reddy (@jsuryareddy) July 13, 2024
अपघातानंतर ट्रकचा चालक ट्रकसह फरार झाला आहे. पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा नोंदवला आहे. बस चालकाला डुलकी लागली होती त्यामुळे हा अपघाता झाला अशी माहिती समोर येत आहे. जखमींमध्ये पुरुष, महिलासह लहानमुलांचा समावेश आहे. मृतांमध्ये दोन पुरुष आणि एका महिलेचा समावेश आहे.