Nupur Sharma, Naveen Jindal, Saba Naqvi (PC - Twitter)

Prophet Muhammad Row: दिल्ली पोलिसांच्या इंटेलिजन्स फ्यूजन आणि स्ट्रॅटेजिक ऑपरेशन (IFSO) युनिटने काही लोकांविरुद्ध द्वेषयुक्त संदेश पसरवल्याबद्दल आणि सोशल मीडियावर पोस्ट केल्याबद्दल विविध कलमांखाली गुन्हा दाखल केला आहे. प्रेषित मोहम्मद यांच्याविषयी वादग्रस्त वक्तव्य केल्याप्रकरणी नुपूर शर्मा (Nupur Sharma), नवीन जिंदाल (Naveen Jindal), सबा नक्वी (Saba Naqvi) यांच्यासह अनेकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

कारवाई करण्यात आलेल्यांमध्ये अशा लोकांचा समावेश आहे, ज्यांनी वेगवेगळ्या ग्रूपमध्ये सोशल मीडियाद्वारे भडकावू संदेश पाठवले होते. या संदेशाद्वारे सार्वजनिक शांतता भंग होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. IFSC युनिटचे DCP KPS ​​मल्होत्रा ​​यांनी स्वतः अशा डझनभर प्रमुख लोकांविरुद्ध FIR नोंदवल्याची पुष्टी केली. ते म्हणाले की, हा एफआयआर विविध धर्माच्या अनेक व्यक्तींविरोधात नोंदवण्यात आला आहे. (हेही वाचा - Uddhav Thackeray Statement: नुपूर शर्माच्या वक्तव्यामुळे भारताचा अपमान झाला म्हणत मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची भाजपवर जोरदार टीका)

यामध्ये सायबर स्पेसमध्ये गडबड करण्याच्या उद्देशाने खोटी माहिती प्रसारित केल्याबद्दल कलमे लावण्यात आली आहेत. गुन्हा दाखल करून तपासात गुंतलेले पोलीस विविध सोशल मीडिया संस्थांच्या भूमिकेचीही चौकशी करणार आहेत. यासोबतच काही लोकांच्या सोशल मीडिया युआरएलचीही चौकशी केली जाणार आहे. यासाठी वापरण्यात आलेल्या सोशल मीडियाच्या प्लॅटफॉर्मशीही दिल्ली पोलीस संपर्क साधणार आहेत.

दिल्ली पोलिसांच्या आयएफएससी युनिटच्या डीसीपीनुसार, नवीन कुमार जिंदाल, नुपूर शर्मा, शादाब चौहान, सबा नक्वी, मौलाना मुफ्ती नदीम, अब्दुर रहमान आणि गुलजार अन्सारी हे स्कॅनरच्या कक्षेत आले आहेत. दिल्ली पोलिसांनी या लोकांसह इतर काही जणांविरुद्ध विविध तरतुदींखाली गुन्हा दाखल केला आहे.