आता SBI बँकेतून व्यवहार करा आणि मिळवा 5 लिटर पेट्रोल अगदी मोफत
प्रातिनिधिक प्रतिमा (Photo Credits: PTI)

स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI)ने ग्राहकांसाठी एक भन्नाट ऑफर चालू केली आहे. या ऑफरद्वारे ग्राहकांना फ्रीमध्ये पेट्रोल मिळवण्याची संधी एसबीआय देत आहे. बँकेने दिलेल्या माहितीनुसार इंडियन ऑईल कॉर्पोरेशनच्या कुठल्याही रिटेल पेट्रोल पंपावर, भीम अॅपद्वारे एसबीआय बँकेतून आर्थिक व्यवहार केल्यास ग्राहकाला 5 लिटर पेट्रोल मोफत मिळवता येणार आहे. या ऑफरचा फायदा घेण्यासाठी तुम्हाला कमीतकमी 100 रुपयांचे पेट्रोल भरावे लागणार आहे. एसबीआयची ही  ऑफर 23 नोव्हेंबर 2018 पर्यंत चालू असणार आहे.

बँकेच्या वेबसाईटवर दिलेल्या माहितीनुसार ग्राहकांना पेट्रोल खरेदी केल्यानंतर BHIM अॅपद्वारे पैसे चुकते करावे लागणार आहेत. भीम अॅपद्वारे केलेल्या आर्थिक व्यवहाराचा नंबर लिहून 9222222084 या नंबरवर एसएमएस करावा लागणार आहे. यासाठी तुम्हाला एसएमएसचे मूल्य भरावे लागेल. त्यानंतर तुमचा नंबर निवडला गेला तर, तुम्हाला एसबीआयकडून तसा मेसेज येईल. अशाप्रकारे तुम्ही तुम्ही 5 लिटर मोफत पेट्रोल योजनेसाठी पात्र ठरणार आहात. या योजनेंतर्गत एका दिवसाला 10 हजार ग्राहकांना 5 लिटर पेट्रोल मोफत जिंकण्याची संधी एसबीआयने उपलब्ध करून दिली आहे.

याबाबत कोणतीही शंका असल्यास कस्टमर केअरशी संपर्क करण्यासाठी तुम्ही टोल फ्री नंबर 1800 22 8888 चा वापर करू शकता. तसेच help@xtrarewards.com या आयडीवर मेलदेखील पाठवू शकता. देशातील सर्वात मोठी बँक असलेल्या स्टेट बँक ऑफ इंडियाकडून डिजिटल व्यवहारांना चालना देण्यासाठी आणि भीम अॅपच्या युजर्संची संख्या वाढविण्यासाठी ही योजना सुरू करण्यात आली आहे.