Nirbhaya Case Convicts (Photo Credits: File Image)

निर्भया बलात्कार प्रकरणातील (Nirbhaya Gang Rape Case) दोषी विनय शर्मा (Vinay Sharma) याच्यावर काही दिवसांपूर्वी विषप्रयोग झाला होता, असा खळबळजनक आरोप करण्यात आला आहे. विनय शर्मा याच्या वकिलांनी न्यायालयात झालेल्या सुनावणीवेळी विनय याला तिहार तुरूंगात विष देण्यात आले होत. तसेच त्यानंतर त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. परंतु, याबाबत कोणतीही माहिती देण्यात आली नाही, असंही विनय शर्मा यांच्या वकिलांने म्हटलं आहे.

निर्भया बलात्कार प्रकरणातील आरोपींना 1 फेब्रुवारीला फासावर लटकवण्यात येणार आहे. परंतु, आरोपीच्या वकिलांकडून त्यांची फाशीची शिक्षा पुढे ढकलण्याचा प्रयत्न होत आहे. विनय शर्मा यांनी केलेला आरोपही खोटा असल्याच्या चर्चा सध्या सर्वत्र रंगल्या आहेत. (वाचा - Nirbhaya Case: डेथ वॉरंट जारी करणारे न्यायमूर्ती सतीश कुमार अरोडा यांची सुप्रीम कोर्टात अ‍ॅडशिनल रजिस्टर पदासाठी नियुक्ती)

विनय शर्माचे वकिल एपी सिंह यांनी याचिकेत म्हटले आहे की, तिहार जेल प्रशासनाने अद्याप दोषी पवन, अक्षय आणि विनय यांची कागदपत्रे दिली नाहीत. म्हणून राष्ट्रपतींकडे क्यूरेटिव्ह याचिका आणि दया याचिका पाठविण्यास विलंब होत आहे. त्यामुळे न्यायालयाने लवकरात-लवकर तुरूंग प्रशासनाला कागदपत्रे उपलब्ध करून देण्याच्या सूचना द्याव्यात, असंही सिंह यांनी म्हटलं आहे. दरम्यान, फिर्यादी पक्षाच्या वकिलांनी हा दावा फेटाळून लावला आहे. आरोपींच्या वकिलांकडून केवळ वेळकाढूपणा करण्यात येत असल्याचे फिर्यादी पक्षाच्या वकिलांनी म्हटले आहे.