अमेरिकेमध्ये Bronx Zoo मध्ये वाघिण COVID-19 पॉझिटिव्ह आढळल्यानंतर भारतात प्राणिसंग्रहालयांना हाय अलर्ट जारी;  प्राण्यांवर सीसीटीव्हीच्या माध्यमातून 24x7 ठेवली जाणार नजर
File Image: Pexels

न्यूयॉर्क मधील Bronx Zoo मधील वाघ कोव्हिड 19 च्या विळख्यात आल्यानंतर आता भारतामध्येही वन्य प्राण्यांना सुरक्षित ठेवण्यासाठी यंत्रणा सज्ज करण्यात आली आहे. दरम्यान सार्‍या अभयारण्यांना हाय अलर्टवर ठेवण्यात आलं आहे. प्राण्यांच्या अ‍ॅबनॉर्मल वागणुकीवर लक्ष ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. दरम्यान संशयित प्राण्यांचे सॅम्पलदेखील प्राण्यांच्या दवाखान्यात पाठवण्याचे आदेश आहेत. याबाबत आज (6 एप्रिल) Central Zoo Authority of India कडून खास नियमावली जारी करण्यात आली आहे.

दरम्यान न्यूयॉर्क येथील Bronx Zoo मध्ये 4 वर्षीय Nadia नामक वाघीण अमेरिकेमध्ये कोव्हिड पॉझिटिव्ह आढळली आहे. अशाप्रकारे अमेरिकेत प्राण्यांमध्ये तर जगात कोणत्याही वाघांमध्ये कोरोना व्हायरस आढळण्याची ही पहिलीच घटना आहे. Coronavirus: आता वाघालाही कोरोना व्हायरस बाधला, चाचणी पॉझिटीव्ह; न्यूयॉर्क शहरातील प्राणिसंग्रहालयातील घटना.

ANI Tweet 

भारतामध्ये सुमारे 160 प्राणीसंग्रहालयं आहेत. यामध्ये 56,800 पेक्षा अधिक प्राण्यांचा समावेश आहे. सध्या 25 मार्चपासून भारतात लॉकडाऊन असल्याने सारीच प्राणीसंग्राहलयं बंद आहेत. मात्र आता प्राण्यांवर सीसीटीव्ही कॅमेर्‍याच्या माध्यमातून 24x7 लक्ष ठेवा, काही लक्षण, वागणूकीमध्ये बदल आढळल्यास तात्काळ संबंधित डॉक्टरांना कळवा अशा सूचना CZAI कडून करण्यात आल्या आहेत. आता आजारी प्राण्यांनादेखील क्वारंटीन केले जाणार आहे. दरम्यान अशा प्राण्यांची काळजी घेताना पीपीई किट आणि प्रोटेक्शन गियर घालून जाण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

Hong Kong अ‍ॅग्रिकल्चर अथॉरिटीकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, पाळीव मांजरी किंवा कुत्र्यांमधून कोरोना व्हायरसचं संक्रमण होण्याची शक्यता नाही. मात्र ते कोरोनाबधित मालकाच्या/ माणसाच्या संपर्कात आल्यास त्यांना लागण होऊ शकते.