Zomato विकत घेणार UberEats कंपनी; 15-20 कोटी रुपयांची गुंतवणूक होण्यीच शक्यता
Zomato-UberEats | (Photo Credit: Archived, Edited And Representative images)

स्थानिक आणि छोट्या हॉटेल व्यावसायिकांची मोठी स्पर्धक ठरलेली Zomato ही ऑनलाईन फूड डिलीवरी प्लॅटफॉर्म उपलब्ध करुन देणारी कंपनी लवकरच आपली प्रतिस्पर्धी कंपनी UberEats खरेदी करण्याची शक्यता आहे. दोन्ही कंपन्यांमध्ये त्याबाबत बोलणी सुरु असल्याचे वृत्त प्रसारमाध्यमांनी दिले आहे. अद्याप ही बोलणी नेमकी कोणत्या पातळीवर सुरु आहेत याबाबत पुष्टी होऊ शकली नाही. मात्र, खरोखरच असे घडले तर येत्या काळात Zomato ही ऑनलाइन फूड डिलीवरी प्लॅटफॉर्म उपलब्ध करुन देणारी मोठी कंपनी ठरण्याची शक्यता आहे.

या संदर्भात  livemint ने TechCrunch च्या हवाल्याने दिलेल्या वृत्तात म्हटले आहे की, उबर आपले ऑनलाईन डिलीवरी अॅप UberEats विकण्याच्या विचारात आहे. या वृत्तात असेही म्हटले आहे की, या व्यवाहारात Uber, Zomato मध्ये 15 ते 20 कोटी रुपये गुंतवण्याची शक्यता आहे. सूत्रांचा हवाला देत प्रसारमाध्यमांनी म्हटले आहे की, UberEats कंपनीची बाजारपेठीय मूल्य (Market Value) 40 मिलियन डॉलर म्हणजेच तब्बल 40 कोटी रुपयांच्या जवळपास आहे.

दरम्यान या संभाव्य व्यवहाराबाबत Zomato कंपनीकडून अद्याप कोणतीही माहिती पुढे आली नाही. मात्र, Zomato इतका मोठा निधी जमवत आहे. काही दिवसांपूर्वीच Zomato कंपनीचे सीईओ आणि संस्थापक दीपंदर गोयल यांनी म्हटले होते की, आगामी काळात 60 कोटी निधी जमविण्याचे कंपनीचे लक्ष्य आहे. (हेही वाचा, ऑनलाईन ऑर्डर केलेल्या जेवणात सापडले प्लास्टिक; झोमॅटो डिलिव्हरी बॉयने पार्सलमध्ये बदल केल्याचा हॉटेल मालकाचा आरोप)

भारतामध्ये ऑनलाईन फूड डिलीवरी व्यवसाय सातत्याने वाढत आहे. ही नवी बाजारपेठ 2023 या वर्षापर्यंत 17.02 बिलियन डॉलपर्यंत पोहोचण्यीची शक्यता आहे. Zomato आणि Swiggy या दोन्ही कंपन्या या क्षेत्रात दमदार कामगीरी करत आहेत. तर 2017 मध्ये मार्केटमध्ये आलेल्या UberEats कंपनीची कामगिरी तितकीशी दमदार राहिली नव्हती, असे अभ्यासक सांगतात.