Zepto Cafe | X @ Aadit Palicha

Zepto चे सहसंस्थापक Aadit Palicha यांनी आज (11 डिसेंबर) Zepto Cafe या नव्या अ‍ॅपची घोषणा केली आहे. पुढील आठवड्यात हे अ‍ॅप लॉन्च केले जाणार आहे. LinkedIn वर केलेल्या पोस्ट मध्ये त्यांनी या नव्या प्रोजेक्टची घोषणा केली आहे. Zepto Cafe च्या माध्यमातून दहा मिनिटामध्ये फूड डिलेव्हरी होणार आहे. आता हे स्वतंत्र अ‍ॅप असणार आहे.

Zepto कडून मागील महिन्यात कॅफे सर्व्हिस वाढवण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली होती. गेल्या महिन्यात, Zepto ने मुंबई, दिल्ली आणि बेंगळुरू आणि लवकरच हैदराबाद, चेन्नई आणि पुणे येथे 120 हून अधिक कॅफेद्वारे मोठ्या शहरांमध्ये कॅफे सेवेचा विस्तार करण्याची घोषणा केली आहे.

आतापर्यंत Zepto Cafe हा Zepto app चाच एक भाग होता पण त्यामध्ये आता बदल करून Zepto Cafe स्वतंत्र अ‍ॅप केले जाणार आहे. ग्राहकांचा वाढता प्रतिसाद पाहून हा निर्णय घेण्यात आला आहे.

Zepto Cafe च्या माध्यमातून सध्या अन्नपदार्थ, पेयं ज्यात कॉफी, ज्यूस यांचा समावेश आहे तर स्नॅक्स पासून मिल्सच्या अनेक पर्यायांचाही त्यामध्ये समावेश आहे.

झेपटो प्रमाणेच वर्षाच्या सुरुवातीला, स्विगीने बोल्टच्या लॉन्च करत 10 मिनिटांत फूड डिलेव्हरीच्या या क्षेत्रात प्रवेश केला. लाँच झाल्यापासून दोन महिन्यांनी, कंपनीने अलीकडील कमाईच्या अहवालात म्हटले आहे की, आता सर्व फूड डिलेव्हरीपैकी त्याचा 5% वाटा आहे.

Zomato ने देखील 10-मिनिटांच्या डिलिव्हरीची चाचणी देखील केली आहे. पण 2022 मध्ये बेंगळुरू, गुरुग्राम आणि दिल्ली येथे पायलट केल्यानंतर वर्षभरात सेवा रद्द केली. जानेवारी 2023 मध्ये ते Zomato Instant वर या ऑफरचे पुन्हा ब्रॅन्डिंग करत असल्याचे सांगितले होते.