धक्कादायक! Xiaomi कंपनीच्या फोनचा खिशात स्फोट, कव्हरमुळे मोठी हानी टळली
फोनचा ब्लास्ट (संग्रहित-संपादित प्रतिमा)

कोल्हापूर (Kolhapur) येथे मोबाइलचा स्फोट (Mobile Blast) होऊन एका मुलाने आपला डोळा गमावल्याची घटना घडली होती. नाशिक (Nashik) येथे असाच मोबाईलचा स्फोट होऊन घरातील अनेक गोष्टींचे नुकसान झाल्याची घटना घडली. याच धर्तीवर आता चक्क खिशात फोन फुटल्याची धक्कादायक घटना घडली आहे. आंध्र प्रदेश येथे ही घटना घडली आहे. शाओमी (Xiaomi) कंपनीचा हा 'Redmi 6A' फोन असून असून, फोन फुटल्याने ग्राहकाच्या खिशातून प्रचंड धूर देखील निघाला होता.

मिळालेल्या माहितीनुसार, 31 वर्षीय मधू बाबू हे सकाळी ऑफिसला जाण्यासाठी निघाले होते. ते बाहेर पडले. गाडी सुरु करता असताना त्यांच्या लक्षात आले की त्यांच्या खिशात असलेला फोन गरम होत आहे. ते खिशातून फोन बाहेर काढणार इतक्यात त्या फोनचा स्फोट झाला आणि धूर बाहेर पडू लागला. या घटनेमुळे त्यांच्या आजूबाजूचे लोकही घाबरले होते. त्यांनी ताबडतोब फोन बाहेर काढून तो फेकुय्न दिला फेकून दिला. फोन इतका गरम झाला होता की फेकून दिल्यावरही तो प्रचंड लाल दिसत होता. (हेही वाचा: नाशिक येथे चार्जिंगला लावलेल्या MI मोबाईलचा स्फोट; घरातीन अनेक वस्तू जळाल्या)

या अपघातामध्ये मधु यांना किरकोळ जखम झाली आहे. तसेच फोनच्या कव्हरमुळे मोठी हानी टळली आहे. या स्फोटात फोनचे कव्हरदेखील पूर्णपणे फुटले आहे. महत्वाचे म्हणजे एप्रिल 2019 मध्ये म्हणजे काही महिन्यांपूर्वीच त्यांनी हा फोन विकत घेतला होता. 4-5 महिन्यांनतर या मधीलसमस्या सुरु झाल्या. सध्या या घटनेची संपूर्ण माहिती कंपनीला देण्यात आली आहे.