World's Most Powerful Women: फोर्ब्सच्या जगातील सर्वात शक्तिशाली महिलांच्या यादीत भारतामधील 4 महिलांना स्थान; अर्थमंत्री Nirmala Sitharaman 32 व्या क्रमांकावर
Nirmala Sitharaman | (File Image)

अर्थमंत्री निर्मला सीतारामन (FM Nirmala Sitharaman) या फायरब्रँड लीडर म्हणून ओळखल्या जातात. देशाच्या आर्थिक आरोग्याची काळजी घेणाऱ्या अर्थमंत्री निर्मला सीतारामन या पुन्हा एकदा देशातील सर्वात शक्तिशाली महिला (India’s Powerful Women 2023) बनल्या आहेत. निर्मला सीतारामन यांना सलग पाचव्यांदा देशातील सर्वात शक्तिशाली महिला ही पदवी मिळाली आहे. बिझनेस मॅगझिन फोर्ब्सने (Forbes) जगातील 100 शक्तिशाली महिलांची यादी जाहीर केली आहे. या यादीत भारतातील सीतारामन यांच्यासह चार महिलांचा समावेश आहे.

अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्याशिवाय एचसीएल कॉर्पोरेशनच्या अध्यक्षा रोशनी नादर मल्होत्रा, स्टील अथॉरिटी ऑफ इंडियाच्या अध्यक्षा सोमा मंडल आणि बायोकॉनच्या चेअरपर्सन किरण मुझुमदार शॉ यांची नावे फोर्ब्सच्या या यादीत समाविष्ट करण्यात आली आहेत.

फोर्ब्सची ही यादी पैसा, मीडिया, प्रभाव आणि प्रभाव क्षेत्राच्या आधारावर ठरवली जाते. निर्मला सीतारामन यांनी सलग पाचव्यांदा या यादीत आपले स्थान निर्माण केले आहे. या यादी त्यांना 32 वे स्थान मिळाले आहे. रोशनी नाडर यांना 60 वे, सोमा मंडलला 70 वा आणि मजुमदार यांना 76 वे स्थान मिळाले आहे.

64 वर्षीय सीतारामन या इंदिरा गांधी यांच्यानंतर भारताच्या दुसऱ्या महिला अर्थमंत्री ठरल्या आहेत. अर्थमंत्रालयापूर्वी त्यांनी देशाचे संरक्षण मंत्रालय सांभाळले. एचसीएल चेअरपर्सन रोशनी नादर मल्होत्रा ​​या अब्जाधीश उद्योगपती आहेत. एचसीएलची जबाबदारी त्यांच्या खांद्यावर आहे. एचसीएलचे संस्थापक शिव नाडर यांची ती एकुलती एक मुलगी आहे.

भारतीय पोलाद प्राधिकरणाचे विद्यमान अध्यक्ष सोमा मंडल या जानेवारी 2021 पासून या पदावर कार्यरत आहेत. सरकारी मालकीच्या SAIL चे अध्यक्ष असलेल्या त्या पहिल्या महिला आहेत. किरण मुझुमदार-शॉ या देशातील आघाडीच्या भारतीय अब्जाधीश उद्योजीका आहेत. शॉ यांनी भारतात बायोकॉन लिमिटेड आणि बायोकॉन बायोलॉजिक्स लिमिटेडची स्थापना केली. (हेही वाचा: Garba In UNESCO's List of Intangible Cultural Heritage: भारतासाठी अभिमानास्पद! 'गुजरातचा गरबा' युनेस्कोच्या 'अमूर्त वारसा यादीत' समाविष्ट)

या यादीत बिल अँड मेलिंडा गेट्स फाउंडेशनच्या सह-अध्यक्ष मेलिंडा गेट्स तसेच युनायटेड स्टेट्सच्या उपाध्यक्ष कमला हॅरिस यांच्या नावांचा समावेश आहे. यासह गायिका टेलर स्विफ्ट, बियॉन्से, बार्बी यांची नावेही या यादीत आहेत. या यादीत बेल्जियमच्या उर्सुला वॉन डर लेयन (Ursula von der Leyen) प्रथम स्थानावर आहेत.