पासपोर्ट (Image Credits: PTI)

कोरोना विषाणू (Coronavirus) महामारीच्या उद्रेकानंतर, अनेक देशांनी त्यांच्या व्हिसा (Visa) आणि पासपोर्टमध्ये (Passports) अनेक बदल केले आहेत. या बदलांचा त्यांच्या पासपोर्टच्या शक्तीवरही परिणाम झाला आहे. पुन्हा एकदा या यादीमध्ये जपानने (Japan) बाजी मारली आहे. जपान आणि सिंगापूरचा पासपोर्ट हा जगात सर्वात शक्तिशाली पासपोर्ट ठरला आहे. यासह पाकिस्तान आणि उत्तर कोरिया या यादीच्या सर्वात खाली आहेत. हेनले अँड पार्टनर्सने जगातील सर्वात शक्तिशाली पासपोर्टची रँकिंग जाहीर केली आहे. जपान आणि सिंगापूरचे पासपोर्टधारक लोक व्हिसाशिवाय 192 देशांमध्ये प्रवास करू शकतात.

पहिल्या 5 क्रमांकावरील देश -

जपान आणि सिंगापूरनंतर जर्मनी, दक्षिण कोरिया दुसऱ्या क्रमांकावर आहे. या देशांतील लोक 190 देशांमध्ये व्हिसाशिवाय प्रवास करू शकतात. तिसऱ्या क्रमांकावर फिनलँड, इटली, लक्समबर्ग, स्पेन असून त्यांचा व्हिसामुक्त स्कोअर 189 आहे. चौथ्या क्रमांकावर ऑस्ट्रिया, डेन्मार्क असून त्यांचा व्हिसा मुक्त स्कोअर 188 आहे. यूके, यूएसए, झेक प्रजासत्ताक, ग्रीस, माल्टा, नॉर्वे पाचव्या क्रमांकावर आहेत जिथले लोक 185 देशांमध्ये व्हिसाशिवाय प्रवास करू शकतात.

या यादीमध्ये सर्वात शेवटी असलेल देश-

भारतालगतचे देश नेपाळ, बांगलादेश, श्रीलंका यांचे स्थानदेखील शेवटी आहे. रँकिंगनुसार, भारत बुर्किना फासो, ताजिकिस्तानसह 90 व्या स्थानावर आहे. या रँकिंगनुसार, या देशांचे पासपोर्टधारक व्हिसाशिवाय 58 देशांमध्ये प्रवेश करू शकतात. इंटरनॅशनल एअर ट्रान्सपोर्ट असोसिएशन (IATA) च्या विशेष डेटाच्या विश्लेषणावर आधारित हे रँकिंग आहे.