Tejas Express (Photo Credits: ANI)

भारतीय रेल्वेची सहयोगी कंपनी इंडियन रेल्वे कॅटरिंग अॅन्ड टूरिझम कॉर्पोरेशन (IRCTC) रक्षाबंधनासाठी महिला प्रवाशांसाठी विशेष कॅशबॅक ऑफर देणार आहे. ही ऑफर लखनौ-दिल्ली आणि अहमदाबाद- मुंबई दरम्यान धावणारी तेजस एक्सप्रेससाठी दिली जाणार आहे. आयआरसीटीसी येत्या सणाच्या वेळी प्रीमियम ट्रेनच्या प्रवाशांसाठी अधिक आकर्षक यात्रा ऑफ लॉन्च करण्याची योजना तयार करत आहे.(Passport Renew Application: पासपोर्ट Re-Issue साठी ऑफलाईन आणि ऑनलाईन अर्ज कसा कराल?)

आयआरसीटीसीच्या अधिकाऱ्यांनुसार, 15 ऑगस्ट ते 24 ऑगस्ट दरम्यान प्रीमियन ट्रेन तेजस मधून प्रवास करणाऱ्या महिला प्रवाशांना रक्षाबंधनानिमित्त ट्रेनच्या दरामध्ये 5 टक्के विशेष कॅश बॅक ऑफर दिली जाणार आहे. कॅश बॅक ऑफर फक्त देण्यात आलेल्या मार्गासाठी मार्गासाठी लागू असणार आहे. या दरम्यान महिला कितीही वेळा प्रवास करु शकतात. कॅश बॅक ऑफर ही ज्या माध्यमातून तुम्हा तिकिट बुक कराल तेथेच मिळणार आहे. त्याचसोबत ही ऑफर लॉन्चिंगपूर्वी ज्या महिलांनी आपल्या तिकिट बुक केल्या आहेत त्यांना मिळणार आहे.(Independence Day 2021: भारताच्या अमृतमहोत्सवी स्वातंत्र्यदिन सेलिब्रेशन साठी 360-degree VR चं फीचर सह indianidc2021.mod.gov.in नवी वेबसाईट लॉन्च)

Tweet:

तेजस एक्सप्रेसचे संचालन लखनौ-दिल्ली-लखनौ आणि अहमदाबाद-मुंबई-अहमदाबाद मार्गावर केले जाणार आहे. सर्व प्रवाशांच्या आरोग्य आणि सुरक्षिततेसंबंधित उपाययोजनांचे पालन करत 7 ऑगस्ट रोजी दोन प्रिमियम ट्रेन पुन्हा सुरु करण्यात आल्या आहेत. आयआरसीटीसी सध्या आठवड्यातील चार दिवस दोन्ही तेजस ट्रेनचे संचालन करत आहे.