Baby Girl With Four Legs (Photo Credit: ANI)

मध्य प्रदेशच्या (Madhya Pradesh) ग्वालियार (Gwalior) मध्ये एका महिलेने चार पाय असलेल्या बाळाला जन्म दिला आहे. Sikandar Kampoo मधील Aarti Kushwaha असं मातेचं नाव आहे. Kamla Raja Hospital, Women and Child Pediatrics Department मध्ये आरतीची प्रसुती झाली आहे. बुधवार 14 डिसेंबर दिवशी जन्माला आलेल्या या मुलीच्या प्रसुतीनंतर अनेकांमध्ये तिच्याबद्दल उत्सुकता आहे. दरम्यान नवजात बाळ सुदृढ असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली आहे. या मुलीचं वजन 2.3 किलो आहे. बाळाच्या जन्मानंतर Jayarogya Hospital Group, Gwalior च्या डॉक्टरांच्या टीमने देखील बाळाला तपासलं आहे.

Superintendent of Jayarogya Hospital Group Dr RKS Dhakad यांनी ANI ला दिलेल्य माहितीमध्ये नवजात मुलीला 4 पाय असल्याचं म्हटलं आहे. जन्मतः बाळाला ही शारिरीक विकृती आहे. काही भ्रूण एक्स्ट्रा असतात. त्यांना वैद्यकीय भाषेमध्ये Ischiopagus म्हणतात. जेव्हा गर्भ दोन भागात विभागला जातो तेव्हा शरीर दोन ठिकाणी वाढत असतं. नवजात मुलीच्या बाबातीत तिच्या कंबरेखालील भाग विकसित झाला आणि त्यामध्ये चार पाय म्हणजे 2 अधिकचे पाय वाढले. पण ते पाय कार्यान्वित नाहीत.

सध्या मुलीच्या शरीरात इतरत्र देखील अन्य काही शारिरीक विकृती आहेत का? याचं वैद्यकीय परीक्षण डॉक्टरांकडून केले जात आहे. जर बाळ उत्तम स्थितीमध्ये असेल तर तिचे दोन अन्य पाय शस्त्रक्रियेद्वारा काढले जातील. यामुळे ती इतर लोकांप्रमाणे सामान्य जीवन जगू शकेल असे डॉक्टर धाकड म्हणाले आहेत. Baby Born With Two Heads: मध्य प्रदेश मध्ये दोन डोकी, तीन हात असलेल्या बाळाचा जन्म .

सुपरिटेंडटकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार बाळ सध्या Special Newborn Care Unit मध्ये आहे. सध्या तिच्या प्रकृतीवर लक्ष ठेवलं जात आहे. बाळाची प्रकृती पूर्णपणे ठीक असल्याने आता शस्त्रक्रियेने अधिकचे पाय काढून टाकण्याची डॉक्टरांची तयारी सुरू असल्याची माहिती आहे.