तरुणांमध्ये वाढत चाललेले पबजी (PUBG ) ह्या गेमचे लोण आता विवाहित जोडप्यांच्या आयुष्यातही पसरत चालले आहे. त्याचे ताजं उदाहरण म्हणजे पबजी गेम पार्टनरसोबत लग्न करायचे असल्यामुळे एका महिलेने घटस्फोटाची मागणी केली आहे. महिलेच्या ह्या विचित्र मागणीमुळे समुपदेशकही (Counselor)चक्रावले आहेत. पबजी गेममुळे मुलांच्या मनावर विपरित परिणाम होत असल्याच्या घटना नेहमी ऐकायला मिळतात, मात्र आता ह्या गेमपायी चक्क एकाचा संसार मोडणार असल्याची चिन्हे दिसत आहेत.
हा धक्कादायक प्रकार घडलाय तो अहमदाबाद येथे. अधिका-यांनी दिलेल्या माहितीनुसार, घटस्फोटाची मागणी करणारी ही 19 वर्षीय महिला एका बांधकाम कंत्राटदाराची पत्नी आहे. या दाम्पत्याला एक मुलगीसुद्धा आहे. महिलेने दिलेल्या माहितीनुसार, मागील काही महिन्यांपासून या महिलेने पबजी गेम खेळण्यास सुरुवात केली होती. पबजी खेळताना ती एका युवकाच्या संपर्कात आली. हा युवक देखील रोज पबजी खेळायचा. त्यामुळे तिचे हे गेम खेळण्याचे वेडं इतके वाढत गेले की, पबजी गेम खेळणारा जोडीदार आपल्याला आवडत असून त्याच्यासोबतच आपल्याला राहायचे असल्याचे तिने काऊंसिलरला सांगितले.
म्हणूनच ह्या महिलेने महिला हेल्पलाईनकडे घटस्फोटाची मागणी केली आहे. तिच्या घटस्फोटाला तिच्या वडिलांनी विरोध केला आहे. तिच्याशी चर्चा करत असताना तिचा नवरा तिला मारहाण करतो का, असे विचारल्यास आपला नवरा आपल्याला काहीही त्रास देत नसल्याचे तिने सांगितले.
भिवंडी: PUBG गेम खेळण्यावरुन आई रागवल्याने 17 वर्षीय मुलाने घर सोडले
थोडक्यात सांगायचे झाले तर, अवघी तरुणाई पबजीच्या विळख्यात अडकली जात असताना आता लोकांचे संसार देखील ह्याच्या विळख्यात अडकत जातायत की काय असा मोठा सवाल उपस्थित झाला आहे.