नागपूरच्या 'या' तरुणाची बायको अडकली पाकिस्तान मध्ये; कशी हे जाणून घेण्यासाठी वाचा सविस्तर
Representational Image (Photo Credits: File Image)

भारत आणि पाकिस्तान हे दोन्ही देश जरी शेजारी असले तरी त्यांच्यातील तणाव मात्र इतकी वर्ष होऊनही सुटत सुटत नाहीत. फाळणी पासून दोन्ही देशांमधील दुरावा जो वाढत गेला तो आजही कायम आहे आणि अधिक तीव्र होताना दिसत आहे.

परंतु या दोन देशातील वादाचा परिणाम होत आहे तो म्हणजे सामान्य जनतेला. कारण भारत आणि पाकिस्तान हे दोन्ही देश जेव्हा वेगळे झाले तेव्हा अनेकांची कुटुंब तुटली गेली. काहींचं अर्ध कुटुंब सीमेच्या त्या बाजूस गेलं तर अर्ध कुटुंब इथेच राहिलं.

नुकतंच समोर आलेलं एक उदाहरण म्हणजे नागपूरला राहणार विशाल नागपाल. विशालचं गेल्या वर्षी पाकिस्तानमधील अंजली कालरा या मुलीशी लग्न झालं. परंतु लग्नानंतरही अंजलीला भारतात येण्याचा व्हिसा न मिळालेले हे दाम्पत्य आजही एकमेकांपासून लांब राहतंय.

जम्मू-कश्मीर आणि लद्दाख आता केंद्रशासित प्रदेश, नवे नियम लागू      

विशाल आणि अंजलीचं 24 नोव्हेंबर 2018 पाकिस्तानच्या जेकामाबाद येथे लग्न झालं होतं. आणि आता लग्नाला एक वर्ष होत आलं असलं तरी तिला नवऱ्यासोबत राहता येत नाही. आणि म्हणूनच अंजलीने एका व्हिडीओच्या माध्यमातून पंतप्रधान नरेंद्र मोदींना व्हिसा देण्याची विनंती केली आहे.