Husband, Wife and Their Lover: बायकोला भेटला प्रियकर, नवऱ्याने लावून दिले लग्न; ठेवले नाही कोणतेच विघ्न; वाचा सविस्तर
Marriage | Representative Image | (Photo Credits: Pixabay)

चित्रपटातील कहाणी कधी प्रत्यक्षात येऊ शकते का? हा प्रश्न अनेकांना पडतो. खरेतर ते हे विसरतात की, बहुतांश चित्रपटाच्या स्टोरी या वास्तव घटनांवरुनच घेतल्या असतात. हे सांगण्याचे कारण असे की, 1999 मध्ये आलेल्या 'हम दिल दे चुकै है सनम' (Hum Dil De Chuke Sanam) चित्रपटाची कथा वास्तव जीवनात घडल्याचे पुढे आले आहे. होय, उत्तर प्रदेश राज्यातील देवरिया (Uttar Pradesh's Deoria) जिल्ह्यातील एका महिलेचा एका तरुणाशी विवाह झाला. पण, गंमत अशी की, सदर महिलेचे आगोदर प्रेमसंबंध होते. जे लग्नानंतरही सुरुच होते. एके दिवशी तिचा प्रियकर तिला भेटायला आला. गावकऱ्यांनी त्याला चोप दिला. पण, महिलेच्या पतीने मात्र वेगळी भूमिका घेतली. आपली पत्नी आणि तिचा प्रियकर यांना एकत्र बोलावले आणि दोघांनी गावच्या मंदिरात नेऊन त्यांचे लग्न लावून दिले. या घटनेची परिसर आणि पंचक्रोशीत चर्चा सुरु आहे.

देवरिया जिल्ह्यातील या जोडप्याचे लग्न होऊन साधारण वर्ष झाले होते. दरम्यान, महिलेच्या पतिला कळले की, त्याच्या पत्नीचे बिहारच्या एका तरुणाशी प्रेमसंबंध आहेत. पण, त्याच्याकडे कोणताच पुरावा नसल्याने तो काही बोलत नव्हता. एके दिवशी त्याला पुरावा सापडला. मिलेचा बॉयफ्रेंड तिला भेटण्यासाठी एके दिवशी भेटायला आला. पतीचे नातेवाईक आणि गावकऱ्यांना ही माहिती मिळताच त्यांनी त्या तरुणाला बेदम मारहाण केली. नंतर त्या इसमाला महिलेच्या पतीच्या पुढे हजर करण्यात आले. त्याने त्याला असे का केले असे विचारले, त्यावर तो म्हणाला सदर महिलेशी माझे खूप काळापासून प्रेम आहे. त्यामुळे तिच्याशिवाय मी जगू शकत नाही. तिच्या आठवणीने व्याकूळ झाल्याने मी इथे आलो. इंडिया टुडेने याबाबत वृत्त दिले आहे.

आकाश शाह असे या प्रियकराचे नाव असून, तो बिहार येथील गोपालगंज परिसरातील राहणारा आहे. पाठमागील काही वर्षांपासून तिच्याशी त्याचे प्रेमसंबंध होते. दरम्यान, तिचे लग्न झाले पण आकाश तिला विसरु शकला नाही. आठवणींनी व्याकूळ झालेला तो अखेर तिच्या घरी पोहोचला. दरम्यान, पतीला ही माहिती कळताच त्याने थेट वेगळेच दृश्य उभे केले. त्याने चक्क दोघांना गावच्या मंदिरात नेले आणि तिचे लग्न लावले. दुसऱ्याची पत्नी असलेल्या प्रेयसीला भेटण्यासाठी तो ज्या मोटरसायकलवरुन एकटा आला त्याच मोटारसायकलवरुन तो तिला घेऊन गेला. सिंगल सीट आला आणि डबल सिट गेला, अशीच काहीशी हम दिल दे चुके सनम चित्रपटासारखी स्टोरी गावकरऱ्यांनी अनुभवली.