Representational Image (Photo Credits: Pixabay)

कॅडबरी देशातील आयकॉनिक चॉकलेट ब्रँड आज सकाळपासून बॉयकॉट करण्याबाबत ट्रेण्ड होताना दिसत आहे. आता ही कॅडबरीवर होणारी ही टिका त्याच्या जाहिरातीबाबतीत आहे की त्यातील इनग्रेडऐंटबाबत याबाबत मोठी चर्चा सध्या सोसल मिडीयावर रंगली आहे. कॅडबरी किंवा अन्य ब्रँडच्या मार्केटिंगवर अशा प्रकारच्या जाहिरातींवर टीका होण्याची ही पहिलीच वेळ नाही. यापूर्वीही अनेक मोठमोठ्या ब्राण्डला याप्रकारे बॉयकॉट करण्याचा टेण्ड ट्विटरवर चालवण्यात आला आहे. पण यावेळी बॉयकॉट कॅडबरी हा ट्रेण्ड चालवण्यामागचं कारण जरा विचित्रचं आहे. दिवाळीच्या मुहूर्तावर कॅडबरीकडून एक नवीन जाहिरात प्रदर्शित करण्यात आली आहे ज्यात एका दिवे विकणाऱ्या विक्रेत्याचं नाव दामोदर आहे. पण काही सोशल मिडीया वापर्कत्यांकडून असा दावा करण्यात येत आहे कथितपणे ही जाहिरात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वडिलांवर आधारित आहे.

 

कारण पंतप्रधान मोदींच्या वडिलांचं नाव दामोधर मोदी आहे. तरी जाणीवपूर्वक कॅडबरीच्या या जाहिरातीत गरिब दिवे विक्रेत्याचं नाव दामोधर दाखवण्यात आलं अशी टिका काही नेटकऱ्यांकडून करण्यात आली आहे.  विश्वहिंदू परिषदेच्या नेत्या प्राची साध्वीने कॅडबरीची ही जाहिरात ट्वीट केली आहे. शेअर केलेल्या जाहिरातीला प्राची यांनी कॅप्शन लिहिले आहे की, “तुम्ही टीव्ही चॅनेलवर कॅडबरी चॉकलेटची जाहिरात काळजीपूर्वक पाहिली आहे का? दुकानहीन गरीब दिवा विक्रेता दामोदर आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वडिलांचे नाव खराब करण्यासाठी याप्रकारची जाहिरात दाखवण्यात येत आहे. चायवाले का बाप दियावाला. कॅडबरी कंपनीला लाज कशी वाटत नाही असा सवाल उपस्थित करणार ट्वीट प्राची साध्वीने केलं आहे. (हे ही वाचा:- Rahul Gandhi Statement: भाजप सरकार संपूर्ण देशात डबल इंजिनचा भ्रष्टाचार, राहुल गांधींचे वक्तव्य)

 

तर कॅडबरीत बीफचा समावेश असण्याचा आरोप देखील काही नेटकऱ्यांकडून करण्यात येत आहे. कॅडबरी मिठाईच्या नावावर हिंदूंना गोमांस खायला लावत आहे. ते हलाल प्रमाणपत्राद्वारे जिहादी दहशतवाद्यांना आर्थिक मदत करत आहेत, असे आरोप कॅडबरीवर केल्या जात आहे. तर हिंदूंनी हिंदू विरोधी कॅडबरी उत्पादने घेणे बंद केले पाहिजे, अशा अशाचं ट्वीट सध्या ट्वीटरवर ट्रेण्ड होताना दिसत आहे.