प्रतिकात्मक फोटो (File Photo)

Western Railway Recruitment 2021: पश्चिम रेल्वेकडून नर्सिंग स्टाफच्या पदासाठी नोकर भरती करण्यात येणार आहे. यासाठी एक नोटिफिकेशन सुद्धा जाहीर केले आहे. त्यानुसार एकूण 18 पदांवर नियुक्ती केली जाणार आहे. अशातच ज्या उमेदवारांना या पदासाठी अर्ज करायचा आहे त्यांनी अधिकृत वेबसाइट wr.indianrailway.gov.in वर जाऊन नोटिफिकेशन वाचू शकता. उमेदवारांनी लक्षात ठेवावे की, त्यांची निवड इंटरव्यूच्या माध्यमातून होणार आहे. हा इंटरव्यू येत्या 21 जून 2021 रोजी आयोजित केला जाणार आहे.

पश्चिम रेल्वेकडून जाहीर करण्यात आलेल्या नोटिफिकेशननुसार, उमेदवारांना भारतीय नर्सिंग परिषद किंवा बीएससी द्वारे मान्यताप्राप्त नर्सिंग स्कूल किंवा अन्य संस्थेतून जनरल नर्सिंग आणि मिडवायफरी मध्ये 3 वर्षांचा कोर्स पूर्ण केलेला असावा. उमेदवारांचे वय 20-40 वर्षादरम्यान असावे. याव्यतिरिक्त आरक्षित वर्गासाठी उमेदवारांना केंद्र सरकारच्या नियमानुसार सूट दिली जाणार आहे.

उमेदवारांनी लक्षात ठेवावे की, 21 जून रोजी होणाऱ्या इंटरव्यूचे आयोजन रेल्वे रुग्णालय, प्रतापनगर वडोदरा-04 मध्ये आयोजित केले जाणार आहे. दरम्यान उमेदवारांनी लक्षात ठेवावे की, इंटरव्यू मध्ये जन्म तारीख, परिक्षांचे उत्तीर्ण प्रमाणपत्र, रजिस्ट्रेशन, अनुभव आणि जात प्रमाणपत्र घेऊन यावे. तसेच नोकर भरतीच्या प्रक्रियेसंबंधित माहितीसाठी उमेदवारांनी अधिकृत वेबसाइटला भेट द्यावी.(7th Pay Commission: केंद्रीय कर्मचार्‍यांना या महिन्यात मिळू शकते डबल गूडन्यूज; इथे पहा डिटेल्स)

अन्य नोकरी बद्दल बोलायचे झाल्यास नुकत्याच दक्षिण रेल्वेने 3 हजारांहून अधिक रिक्त पदांवर अप्रेंटिसशिप भरती केली जाणार आहे. त्यानुसार, विविध डिविजनमध्ये फिटर, पेंटर, वेल्डरसह काही पदांवप नोकर भरती केली जाणार आहे. या पदांवर ऑनलाइन अर्ज प्रक्रिया 1 जून पासून सुरु झाली असून 30 जून पर्यंत चालणार आहे. या नोकर भरती संदर्भात अधिक माहितीसाठी अधिकृत वेबसाइटला भेट द्यावी.