मुंबई: कांदिवली स्थानकात ओव्हर हेड वायरमध्ये शॉक सर्किट; पश्चिम रेल्वेचं वेळापत्रक कोलमडलं
Image used for representational purpose | (Photo Credits: PTI)

मुंबईमध्ये आज (31 जुलै) दिवशी पश्चिम रेल्वेचं (Western Railway) वेळापत्रक कोलमडलं आहे. सकाळी ऐन कामाच्या वेळेस पश्चिम रेल्वेची वाहतूक तांत्रिक कारणामुळे रखडल्याने रेल्वे स्थानक आणि ट्रेनमध्ये गर्दी आहे. पश्चिम रेल्वेच्या धीम्या लोकल सुमारे 10-15 मिनिटं उशिरा धावत असल्याने मुंबईकरांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. मुंबईमध्ये अधून मधून जोरदार पावसाच्या जोरदार सरी बरसत असल्याने अनेकदा त्याचा परिणाम रेल्वे वाहतुकीवर होत आहे.

कांदिवली स्थानकामध्ये ओव्हरहेड वायरमध्ये शॉक सर्किट झाल्याने रेल्वे सेवा विस्कळीत झाली आहे. Maharashtra Monsoon 2019 Forecast: मुंबईमध्ये पुढील काही दिवस पावसाचा जोर कायम राहणार; हवामान खात्याचा अंदाज

 मुंबईकरांच्या प्रतिक्रिया  

मुंबईमध्ये 23 जुलैपासून जोरदार पावसाला सुरूवात झाली आहे. आज हवामान खात्याने वर्तवलेल्या अंदाजानुसार, या विकेंडपर्यंत पावसाचा जोर कायम राहणार आहे.