पश्चिम बंगाल (West Bengal Train Derailment) येथील खरगपूर (Kharagpur Division) विभागातील नालपूर (Nalpur Train Accident) स्थानकाजवळ '22850 सिकंदराबाद-शालीमार सुपरफास्ट वीकली एक्सप्रेस' (Secunderabad-shalimar Express) रुळावरून घसरली. ही घटना आज पहाटे 5:31 च्या सुमारास घडली. प्राप्त माहितीनुसार, दोन प्रवासी डबे आणि एक पार्सल व्हॅन रुळावरून घसरल्याने तीन डबे रुळावरून घसरले. घटनेमध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही. तसेच, मोठी दुखापत अथवा नुकसान झाले नाही. रेल्वे अधिकारी आणि बचाव पथके तातडीने घटनास्थळी दाखल झाले आहेत. मदत आणि बचाव कार्य सुरु आहे.
गंभीर दुखापत किंवा जीवितहानी झालेली नाही
रेल्वे अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, रेल्वे अपघात झाल्याची महिती मिळताच प्रवाशांच्या मदतीसाठी आणि आवश्यक वैद्यकीय सहाय्य पुरवण्यासाठी संतरागाची आणि खरगपूर येथून अपघात मदत आणि वैद्यकीय सहाय्य पथके घटनास्थळी पोहोचली आहेत. अपघातामुळे खोळंबा झालेल्या प्रवाशांना त्यांच्या गंतव्यस्थानावर नेण्यासाठी बसेसची व्यवस्था करण्यात आली आहे आणि मार्गाच्या दुरुस्तीचे (Train Derailment News) काम सुरू आहे. रेल्वे अधिकार्यांनी अधिक माहिती देताना सांगितले की, कोणतीही गंभीर दुखापत किंवा जीवितहानी झालेली नाही. सुरुवातीच्या अहवालात केवळ एक किंवा दोन प्रवाशांना किरकोळ दुखापत झाल्याची माहिती आहे. मात्र, इतर कोणती दखलपात्र दुखापत अथवा मानवी हानी नाही. (Kanchenjunga Express Accident: कंचनजंगा एक्सप्रेस आणि मालगाडी यांच्यात सिलीगुडी येथे धडक, रेल्वे अपघातात अनेक जखमी)
मदतीसाठी आपत्कालीन संपर्क
अपघात अथवा इतर कोणत्याही चौकशीसाठी, प्रवासी आणि कुटुंबातील सदस्य खरगपूर हेल्प डेस्कवर संपर्क साधू शकतात. त्यासाठी संपर्क क्रमांक खालील प्रमाणे:
रेल्वेः 63764
पी अँड टीः 032229-3764
दरम्यान, रेल्वेने आश्वासन दिले आहे की दुरुस्तीचे काम वेगाने सुरू होईल आणि प्रवासातील व्यत्यय कमी करण्यासाठी उपाययोजना केल्या जात आहेत. (हेही वाचा, World's Highest Chenab Railway Bridge: जगातल्या सर्वात उंच पुलावर ट्रेनची ट्रायल, रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी शेअर केला व्हिडिओ)
रेल्वेचे डबे घसरले
VIDEO | West Bengal: Few coaches of 22850 Secundrabad-Shalimar Express derail in Howrah. More details awaited.
(Source: Third Party) pic.twitter.com/Sr3ltPVAqw
— Press Trust of India (@PTI_News) November 9, 2024
दक्षिण-पूर्व रेल्वेचे सीपीआरओ ओम प्रकाश चरण यांनी माहिती देताना सांगितले की, आज पहाटे 5:31 वाजता, सिकंदराबाद शालीमार साप्ताहिक एक्सप्रेस ट्रेन मिडल लाईनवरून डाऊन लाईनकडे जात असताना रुळावरून घसरली. एक पार्सल व्हॅन आणि दोन प्रवासी डबे रुळावरून घसरले आहेत. प्रवाशांना त्यांच्या पुढील प्रवासासाठी 10 बसेसची व्यवस्था करण्यात आली आहे.
दरम्यान, रेल्वे अपघात होण्याची ही पहिलीच वेळ नाही, या आधीही पश्चीम बंगाल आणि इतर अनेक राज्यांमध्ये रेल्वे अपघाताच्या घटना घडल्या आहेत. ज्यामध्ये कधी डबे रुळवरुन घसरण्याची घटना घडली आहे तर कधी सिग्नल यंत्रणेत बिघाड झाल्याने दोन ट्रेन एकमेकांना समोरासमोर धडकल्या आहेत. कधी आगोदरच फलाटावर उब्या असलेल्या ट्रेनला पाठिमागून आलेल्या दुसऱ्या ट्रेनने धडक देण्याची घटनाही घडली आहे.