पश्चिम बंगालच्या (West Bengal) मुख्यमंत्री ममता बॅनर्जी (Chief Minister Mamata Banerjee) या घरी ट्रेडमिलवर चालतेवेळी कोसळल्यामुळे त्यांच्या डोक्याला मार लागला. त्यांना तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. त्यांच्या डोक्याला तीन टाके आणि ईसीजी सीटी स्कॅन केल्यानंतर पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आले आहे. (हेही वाचा - Mamata Banerjee Sustains Major Injury: बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना मोठी दुखापत; रुग्णालयात दाखल, TMC ने दिली माहिती (Photos))
पाहा पोस्ट -
Mamata discharged, to be under 'close monitoring' after suffering injury on forehead
Read @ANI Story | https://t.co/Xm5SbBi6nM#MamataBanerjee #TMC #WestBengal pic.twitter.com/RrdvXjm9ia
— ANI Digital (@ani_digital) March 15, 2024
पश्चिम बंगालमधील एसएसकेएम रुग्णालयाचे संचालक डॉ. मणिमॉय बंदोपाध्याय यांनी यासंदर्भात माहिती दिली. घरी पाय घसरून पडल्यानं मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली होती. त्यांना तात्काळ रुग्णालयात नेण्यात आलं, तिथे डॉक्टरांनी त्यांच्या जखमेवर टाके घालून उपचार केले. तसेच, त्यानंतर आवश्यक त्या सर्व तपासण्या देखील करण्यात आल्या आहेत. ममता बॅनर्जी यांना झालेल्या दुखापतीवर उपचार करुन त्यांना घरी सोडण्यात आलं आहे. त्यांनी सांगितलं की, मुख्यमंत्र्यांना मागून धक्का लागल्यामुळे त्या पाय घसरुन पडल्या. डॉक्टरांनी त्यांच्या कपाळावर तीन टाके घातले आणि एक टाका नाकाला झालेल्या दुखापतीला घातला आहे.
ममता बॅनर्जी यांना यापूर्वी अनेकदा अपघातांना आणि दुखापतींना सामोरं जावं लागलं आहे. 2021 मध्ये त्यांच्या पायाला गंभीर दुखापत झाली होती. त्यामुळे त्यांच्यावर काही महिने उपचार सुरु होते. हा अपघात झाला तेव्हा पश्चिम बंगालमध्ये विधानसभा निवडणुका सुरू होत्या. दरम्यानच्या काळात त्यांना अपघात झाला होता. त्यांच्या पायाला गंभीर दुखापत झाली होती. त्यानंतर ममता बॅनर्जी यांना 2023 मध्येही अपघात झाला होता. हा अपघात सिलीगुडी येथे झाला होता. त्यांच्या हॅलिकॉप्टरची एमरजन्सी लँडिग करावी लागली होती.