Mamata Banerjee Sustains Major Injury: बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना मोठी दुखापत; रुग्णालयात दाखल, TMC ने दिली माहिती (Photos)
छायाचित्रात ममता बॅनर्जी यांच्या डोक्यावर खोल जखम दिसत आहे, तसेच त्यातून रक्ताची धारही वाहताना दिसत आहे. ममता बॅनर्जी यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
Mamata Banerjee Sustains Major Injury: पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी जखमी झाल्या आहेत. तृणमूल काँग्रेसने छायाचित्रे जारी करून ही माहिती दिली आहे. टीएमसीने सांगितले की त्यांच्या अध्यक्षा आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना मोठी दुखापत झाली आहे. छायाचित्रात ममता बॅनर्जी यांच्या डोक्यावर खोल जखम दिसत आहे, तसेच त्यातून रक्ताची धारही वाहताना दिसत आहे. ममता बॅनर्जी यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ममता बॅनर्जी यांना कोलकाता येथील सरकारी एसएसकेएम रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र त्या कशा जखमी झाल्या याची माहिती अद्याप मिळालेली नाही. मुख्यमंत्री ममता बॅनर्जी काही कार्यक्रम करून परतत असताना त्यांच्यासोबत हा अपघात झाल्याचे सांगण्यात येत आहे. (हेही वाचा: Army Team Assaulted Over Food Bill Payment: जेवणाच्या बिलावरून आर्मी मेजर आणि 16 जवानांवर पंजाबमधील ढाब्यावर हल्ला, मालकाला अटक)
Our chairperson @MamataOfficial sustained a major injury.
Please keep her in your prayers 🙏🏻 pic.twitter.com/gqLqWm1HwE
— All India Trinamool Congress (@AITCofficial) March 14, 2024
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Mar 14, 2024 09:00 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

