पश्चिम बंगाल (West Bengal) च्या उत्तर दिनाजपूर मधील हेमताबाद (Hemantabad) या आरक्षित जागेचे भाजप आमदार देबेन्द्र नाथ रॉय (Debendra Nath Ray) यांचा मृतदेह आज त्यांच्या घराजवळील बाजारात लटकवलेला आढळून आला. बिंदल भागात या मुळे साहजिकच खळबळ माजली आहे. रे यांची हत्या करून मग हा मृतदेह इथे आणून भर बाजारात लटकवल्याचा संशय आहे. देबेंद्र यांच्या कुटुंबातील एका सदस्याने दिलेल्या माहितीनुसार, काल रात्री साधारण एक वाजता घरी काही लोक घरी आले आणि देबेंद्र यांना आपल्यासोबत घेऊन गेले होते त्यानंतर सकाळी त्यांचा मृतदेह त्यांच्या घरापासून एक किमी अंतरावर असणाऱ्या बाजारात लटकवलेला दिसून आला. या प्रकरणी भाजपचे राष्ट्राध्यक्ष जे.पी. नड्डा (J.P. Nadda)यांनी ममता बॅनर्जी (Mamta Banarjee) सरकार मध्ये खुलेआम गुंडाराज सुरु आहे असं म्हणत आरोप लगावला आहे.
जे. पी. नड्डा यांनी देबेंद्र यांच्या अशा मृत्यूनंतर ट्विट करत म्हंटले की, संशयितरित्य अत्यंत क्रूरपणे देबेंद्र नाथ रे यांची करण्यात आलेली हत्या अत्यंत धक्कादायक आहे. यावरुन ममता बॅनर्जी यांच्या सरकारमधील गुंडाराज आणि कायदा सुवस्था ढिसाळ असल्याचं स्पष्ट होत आहे, अशा सरकारला लोक सुद्धा कधी माफ करणार नाहीत, आम्ही याचा स्पष्ट विरोध करतो."
ANI ट्विट
We demand CBI inquiry into the killing of BJP MLA from Hemtabad, Debendra Nath Ray. Trinamool Congress is behind this killing and has made it look like a suicide. I request West Bengal CM to order CBI inquiry to find the truth behind the killing: BJP leader Rahul Sinha pic.twitter.com/b6q41zVwSp
— ANI (@ANI) July 13, 2020
जे. पी. नड्डा ट्विट
The suspected heinous killing of Debendra Nath Ray, BJP MLA from Hemtabad in West Bengal, is extremely shocking and deplorable. This speaks of the Gunda Raj & failure of law and order in the Mamta govt. People will not forgive such a govt in the future. We strongly condemn this.
— Jagat Prakash Nadda (@JPNadda) July 13, 2020
पश्चिम बंगाल मधील भाजप नेते राहुल सिन्हा यांनी याप्रकरणी सीबीआय चौकशी व्हावी अशी मागणी केली आहे. या हत्येच्या मागे तृणमुल काँग्रेस चा कट असल्याचा संशय सुद्धा सिन्हा यांनी व्यक्त केला आहे. देबेंद्र नाथ रे यांनी 2019 मध्ये तृणमूल काँग्रेस सोडून भाजप मध्ये प्रवेश केला होता.