West Bengal Assembly Elections 2021: पश्चिम बंगालमध्ये मतदान मोजणी सुरु झाली असून हळूहळू निकाल सुद्धा स्पष्ट व्हायला लागले आहेत. याच दरम्यान. बंगाल मधील नॉर्थ 24 परगना येथून एक वाईट बातमी समोर आली आहे. मतगणनेच्या वेळी एका कर्मचाऱ्याची प्रकृती अचानक बिघडल्याने तो बेशुद्ध झाला. त्यामुळे त्याला तातडीने स्ट्रेचरवरुनच रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. मात्र कर्मचाऱ्याची तब्येत नक्की कोणत्या कारणामुळे बिघडली हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.(Assembly Election Results 2021: केरळमध्ये LDF 75 जागांवर, UDF 56 जागांवर तर NDA 2 जागांवर आघाडीवर)
आतासाठी बेशुद्ध झालेल्या कर्मचाऱ्याला मतदान मोजणी केंद्रातून हटवण्यात आले असून त्याच्यावर प्राथमिक उपचार केले जात आहेत. कर्मचाऱ्याला एका स्ट्रेचरवरुन रुग्णालयात नेण्यात आले. समोर आलेल्या फोटोंवरुन असे समजते की. काही लोक कर्मचाऱ्याला स्ट्रेचरवरुन घेऊन जात आहेत. प्राप्त झालेल्या माहितीनुसार, कर्मचारी मतमोजणी केंद्रावरत बेशुद्ध झाल्याने रुग्णालयात दाखल केले गेले.(Assembly Elections 2021 Results Live News Updates: केरळ मध्ये 'Metro man' आणि भाजपा उमेदवार E Sreedharan Palakkad मध्ये आघाडीवर)
Tweet:
West Bengal: Gopal Som, a counting agent of Congress candidate from Panihati (North 24 Parganas), Tapas Majumder, was taken to a hospital after he fell unconscious at the counting centre. pic.twitter.com/uCpeJxuF11
— ANI (@ANI) May 2, 2021
दरम्यान, पश्चिम बंगालच्या निवडणूकीबद्दल बोलायचे झाल्यास 292 जागांवर मतमोजणी पार पडत आहे. अतापर्यंत समोर आलेल्या एक्झिट पोलनुसार भाजप आणि तृणमूल मध्ये जोरदार टक्कर होणार असल्याचे दिसून येत आहे. दोन्ही बाजूंनी असा दावा करण्यात आला आहे की ते 200 हून अधिक जागांवर विजय मिळवू शकतात. मात्र निकाल थोड्याच वेळात स्पष्ट होईल. सर्वांच्या नजरा हाय प्रोफाइल सीट नंदीग्राम येथे लागल्या आहेत. तेथे मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना त्यांचे जुने मित्र शुभेंदु अधिकारी यांच्याकडून आव्हान मिळाले आहे. दोन्ही बाजूने जोरदार प्रचार करण्यात आला आहे. त्याचसोबत मोठे दावे सुद्धा करण्यात आले आहे.