West Bengal Assembly Election 2021: 'डिस्को डान्सर कोबरा' पश्चिम बंगाल विधानसभा निवडणूक रिंगणाबाहेरच, मिथुन चक्रवर्ती  यांना भाजप तिकीट नाहीच
Mithun Chakraborty |(Photo Credits-Twitter)

मी कोबरा आहे असे सांगत भारतीय जनता पक्षात प्रवेश करणारे डिस्को डान्सर अभिनेता मिथुन चक्रवर्ती (Mithun Chakraborty) यांना पश्चिम बंगाल विधानसभा निवडणूक 2021 (West Bengal Assembly Election 2021) च्या रिंगणाबाहेरच राहावे लागणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. भारतीय जनता पक्षाने (BJP) आपल्या उमेदवारांची अंतिम यादी आज (23 मार्च) जाहीर करण्यात आली. या यादीत मिथुन चक्रवर्ती यांचे नाव नाही. मिथुन चक्रवर्ती यांनी भाजप प्रवेश केल्यानंतर त्यांना उमेदवारी मिळणार असल्याची आणि भाजपकडून ती दिली जाणार असल्याच्या जोरदार चर्चा रंगल्या होत्या. मात्र, या चर्चा अखेर निराधार असल्याचे आता स्पष्ट झाले आहे.

चर्चा होती की मिथुन चक्रवर्ती यांना रासबिहारी विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी दिली जाईल अशी चर्चा होती. या ठिकाणाहून आता सेवानिवृत्त लेफ्टिनेंट जनरल सुब्रता साहा यांना भाजपने उमेदवारी दिली आहे. मिथुन चक्रवर्ती यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत 7 मार्च या दिवशी कोलकाता येथे मेगा रॅलीदरम्यन भाजप प्रवेश केला होता. तेव्हापासून चक्रवर्ती यांना रासबिहारी मतदारसंघातून उमेदवारी दिली जाईल, अशी शक्यता वर्तवली जात होती.

उल्लेखनीय असे की, भाजप प्रवेश करताना मिथुन चक्रवर्ती यांनी बंगाली चित्रपटातील एक डायलॉगही मारला होता. 'मी तुम्हाला इथे मारेण आणि आपला मृतदेह स्मशानभुमीत सापडेल'. त्या दिवशी त्यांनी एक राजकीय वक्तव्य केले होते. मी कमी हानिकारक असलेला पाणी किंवा साधार साप नाही. कोबरा आहे. एकदा जर डसलो तर आपण थेट फोटोतच पाहायला मिळाल.

दरम्यान, मिथुन चक्रवर्ती यांचे नाव पश्चम बंगालमधील मतदान यादीत समाविष्ट करण्यात आले आहे. त्यांनी आपले मतदान कार्ड मुंबईहून कोलकाताला स्थानांतरीत करण्यात आले आहे. त्यामुळे त्यांना उमेदवारी मिळेल ही शक्यता होती. मात्र आता त्यांच्या आशा मावळल्या आहेत.