Weather Forecast Maharashtra: महाराष्ट्रात पुन्हा बरसणार परतीचा पाऊस, 26 ऑक्टोबर पासून पुढील काही दिवस असणार महत्त्वाचे
Rain | (Image used for representational purpose only) (Photo Credits: Pixabay)

देशातील विविध भागात परतीचा पाऊस ( Monsoon to Return) मुसळधार बरसण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. त्यामुळे देशाती 26 ऑक्टोबर पासूनचे पुढील काही दिवस अत्यंत महत्त्वाचे असणार आहेत. प्रामुख्याने उत्तरपूर्व प्रदेशांमध्ये म्हणजेच ईशान्य मान्सून (Northeast Monsoon) सक्रिय होण्याची शक्यता अधिक आहे. त्यामुळे या प्रदेशातील शेतकऱ्यांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. परतीचा पाऊस आंध्र प्रदेश आणि कर्नाटक मधील काही भागात हा पाऊस मोठ्या प्रमाणावर बरसण्याची शक्यता आहे, असे हवामान विभागाने म्हटले आहे. दरम्यान, परतीचा पाऊस महाराष्ट्रातही (Weather Forecast Maharashtra) काही भागात जोमाने बरसू शकतो. प्रामुख्याने पूर्व विदर्भात हा पाऊस हजेरी लावण्याची शक्यता आहे.

महाराष्ट्रातील शेतरकरी यंदा मान्सूनच्या पावसामुळे पुरता कोलमडून गेला. पाऊस इतका प्रचंड की शेतीचे प्रचंड नुकसान झाले. त्यातून शेतकरी सावरतो न सावरतो. तोवर हवामान विभागाने पुन्हा एकदा परतीच्या पावसाबाबत अंदाज व्यक्त केला आहे. या अंदाजात शेतकऱ्यांनी सतर्कता बाळगावी असे म्हटले आहे. त्यामुळे शेतकरी पुन्हा एकदा चिंताग्रस्त झाला आहे. परतीच्या पावसामुळे उत्तराखंड आणि केरळ या राज्यांमध्ये नुकतीच पूरस्थिती निर्माण झाली आहे. (हेही वाचा, Uttarakhand Rain and Flood Updates: उत्तराखंडमध्ये मुसळधार पाऊस, महापूर; 34 जणांचा मृत्यू, पाहा PHOTOS आणि VIDEOS)

दरम्यान, कोकणाती पाऊस पाठीमागील काही दिसांपासून शांत झाला आहे. पावसाने चांगलीच उगडीप दिल्यामुळे रत्नागिरीकर कडक उन्हाचा सामना करत आहेत. उष्मा दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे नागरिकांची उन्ह आणि उकाड्याने काहीली होत आहे. सर्वसाधारणपणे सकाळी सकाळी 30 ते 31 अंशापर्यंत असणारा तापमानाचा पारा दुपारपर्यंत चांगला 35 अंश सेल्सियसच्या पुढे जाऊ लागला आहे. त्यामुळे रत्नागिरीकरांना ऑक्टोबर हीट चांगलीच तापवत आहे.