भारतात आयात कमी करून निर्यात वाढविण्यावर भर द्यावा- नितीन गडकरी
Nitin Gadkari(Photo Credit: Twitter)

संपूर्ण भारतात कोरोना व्हायरसने (Coronavirus) हाहाकार माजविला असून गेल्या 7 महिन्यांपासून तो देशात ठाण मांडून पडला आहे. या महामारीमुळे आलेले लॉकडाऊन (Lockdown) आणि त्यामुळे लोकांवर आलेली बेरोजगारीची (Unemployment) कु-हाड यामुळे भारतीय पिचून गेला आहे. अनेक उद्योगधंदे ठप्प झाले आहे. देशावर आर्थिक संकट घोंगावत आहे. या सर्वावर मात करण्यासाठी भारतात आयात कमी करुन निर्यात वाढविण्यावर भर द्यावा असे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांनी स्वदेशी जागरण मंचच्या (Swadeshi Jagran Manch) कार्यक्रमात बोलताना सांगितले. ही निर्यात वाढविण्यासाठी स्वदेशी माल बनविण्यावर लोकांनी पुढाकार घेतला पाहिजे असेही त्यांनी यावेळी सांगितले.

कोरोना महामारीमुळे सध्या देशात नकारात्मकता निर्माण झाली आहे. ती दूर करण्यासाठी स्वदेशी माल खरेदी करण्यावर तसेच ती निर्यात करण्यावर जोर दिला पाहिजे. यामुळे देशात सकारात्मक वातावरण तयार होण्यास मदत होईल. Independence Day 2020: 'आत्मनिर्भर भारत हा 130 कोटी भारतीयांचा मंत्र बनला आहे'; स्वातंत्र्य दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा लाल किल्ल्यावरुन देशावासियांशी संवाद

कोरोना व्हायरस विरुद्ध लढण्यासाठी सकारात्मक वातावरण निर्माण होणे गरजेचे आहे असेही त्यांनी यावेळी सांगितले. यामुळे 'आत्मनिर्भर भारत' अभियान ख-या अर्थाने पूर्ण होईल असेही त्यांनी यावेळी सांगितले.

स्वदेशी जागरण मंचच्या या कार्यक्रमात ज्या कंपन्यांनी कामगारांना लॉकडाऊन दरम्यान कामावरून कमी केले नाही अशा कंपन्यांचा सत्कार देखील करण्यात आला. त्याचबरोबर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी स्वदेशी मालाचे महत्व पटवून देत होतकरू तरुणांना मार्गदर्शन केले.