Boycott Of Chinese Goods: चीनी प्रोडक्ट्सवर बॉलिवूडसह क्रिडा क्षेत्राने बहिष्कार टाकण्याचे CAIT यांचे आवाहन
CAIT (Photo Credits-Twitter)

भारत आणि चीन मध्ये झालेल्या संघर्षामुळे भारतीय सेनेचे 20 जवान शहीद झाले आहेत. या घटनेनंतर देशवासियांनी चीनच्या विरोधात संताप व्यक्त करण्यात येत आहे. त्यामुळे नागरिकांनी चीनच्या वस्तूंवर बहिष्कार टाकण्याची मोहिम सुरु केली आहे. याच दरम्यान, कंफेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्स (CAIT) यांनी बॉलिवूडसह क्रिडा क्षेत्रातील व्यक्तींनी चीनच्या प्रोडक्ट्सवर बहिष्कार टाकावा असे आवाहन केले आहे.(India-China clash: CAIT कडून चीनी मालावर बहिष्कार)

सीएआयटी यांनी एक पत्र जाहीर करत असे म्हटले आहे की, बॉलिवूड आणि क्रिडा क्षेत्राने देशाच्या हितासाठी चीनच्या वस्तूंवर बहिष्कार टाकावा. यासाठी त्यांनी आमच्यसोबत हातमिळवणी करावी. त्याचसोबत चीन वस्तूंचे समर्थन करणाऱ्या व्यक्तींनी सुद्धा ते बंद करावे असे ही सीएआयटी यांनी म्हटले आहे.(India China Face-Off: भारतीय जवानांचे बलिदान व्यर्थ ठरणार नाही, जशास तसे उत्तर देण्यास भारत सक्षम- पंतप्रधान नरेंद्र मोदी)

सीएआयटी यांनी 500 हून अधिक चीनी उत्पादनांवर बहिष्कार टाकण्यासंदर्भात एक लीस्ट तयार केली आहे. यामध्ये एफएमजीसी प्रोडक्ट्स, कंज्युमर ड्युरेबल्स, खेळणी, फर्निशिंग फॅब्रिक्स, बिल्डर हार्डवेअर, फुटवेअर, किचनमधील वस्तू, इलेक्ट्रॉनिक्स, स्टेशनरीसह अन्य काही गोष्टींचा यामध्ये समावेश आहे. संगठनेने असे म्हटले आहे की, जर या उत्पादनांवर बहिष्कार टाकल्यास त्यांची भारतात आयात कमी होईल.