व्हिडिओ: भाजप खासदाराच्या कार्यालयाबाहेर गोळीबार; संशयीत आरोपीला अटक
Attack On BJP Leader Hansraj Hans office in Delhi | Photo Credits: ANI

भाजप (BJP ) खासदार तसेच, प्रसिद्ध सुफी गायक हंस राज हंस (BJP MP Hans Raj Hans) यांच्या राजधानी दिल्ली (Delhi) येथील रोहिणी (Rohini परिसरातील कार्यालयासमोर एका व्यक्तीने गोळीबार करण्यात आला आहे. ही घटना सोमवारी (4 नोव्हेंबर 2019) सायंकाळी घडली. दरम्यान, गोळीबार झाल्यामुळे हंस राज हंस (Hansraj Hans) यांच्या कार्यालयात आणि कार्यालयाबाहेर भीतीने धावपळ उडाली. त्या फायदा घेऊन गोळीबार करणारा व्यक्ती पसार झाला. ही घटना घडली तेव्हा हंस राज हंस यांच्या कार्यालयात केवळ एकच व्यक्ती उपस्थित होता. गोळीबार करणाऱ्या व्यक्तीने आपल्य जवळच्या पिस्तूलातून तीन राऊंड गोळीबार केले. ज्यातील दोन गोळ्या हवेत झाडल्या गेल्या. तर, एक गोळी खा. हंस राज हंस यांच्या कार्यालयाच्या दौऱ्यावर झाडली गेली.

प्राप्त माहितीनुसार, हा प्रकार साधारण तीन मिनिटे कायम राहिला. महत्त्वाचे म्हणजे ही घटना घडली त्याच्य 15 मिनिटेच आधी हंस राज हंस आणि त्यांचे सहकारी कार्यालयाबाहेर पडले होते. घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी तातडीने दाखल झाले. गोळीबार करणाऱ्या व्यक्तिचा पोलीस करत असून, या प्रकरणात एका संशयीतास ताब्यात घेतले आहे.

गोळीबार करणारा व्यक्ती सुरुवातीला हंस राज हंस यांच्या कार्यालयात घुसण्याचा प्रयत्न करत होता. मात्र, हंस राज हंस हे कार्यालयात नसल्याचे समजताच त्याने जोरदार आरडाओरडा करत धिंगाणा घालण्यास सुरु केले. यात त्याने जवळचे पिस्तूल काढले आणि गोळीबार केला. गोळीबार करताना हा व्यक्ती खासदार महोदय आपल्याला भेटण्यासाठी वेळ देत नसल्याचे सांगत आरडाओरडा करत होता. (हेही वाचा, दिल्लीत घातक हवेमुळे हेल्थ इमर्जेंसी लागू, नागरिकांना आरोग्यासंबंधित काळजी घेण्याचे आवाहन)

एएनआय ट्विट

गोळीबाराचा आवाज ऐकू येताच परिसरात एकच खळबळ उडाली. लोकांची धावपळ सुरु झाली. याच संधीचा फायदा घेत गोळीबार करणारा व्यक्ती घटनास्थळावरुन पसार झाला. प्राथमिक माहितीनुसार हल्लेखोर व्यक्तीने केशरी रंगाचा कुर्ता परिधान केला होता. ही घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे. सीसीटीव्ही फुटेजवरुन पोलिसांनी एका संशयीतास ताब्यात घेतले आहे. पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या व्यक्तीचे नाव रामेश्वर पहलवान असे एसल्याचे एएनआयने आपल्या वृत्तात म्हटले आहे. या व्यक्तीकडून त्याच्या जवळचे शस्त्र आणि वाहन ताब्यात घेतल्याचे वृत्तात म्हटले आहे. तसेच, या व्यक्तीवर भारतीय दंड संहिता (आयपीसी) कलम 6 and6 आणि 7२7 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पोलीस अधिक तपास करत आहेत.