CCTV Footage of Sudden Death:  मित्रांसोबत चालताना कोसळला तरुण, रस्त्यावरच मृत्यू; व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल, पाहा सीसीटीव्ही फुटेज
Sudden Death CCTV Footage | (Photo Credit - YouTube)

माणसाला मृत्यू कुठे, कसा आणि कधी येईल, याबाबत काहीच सांगता येत नाही. उत्तर प्रदेश (Uttar Pradesh) राज्यातील मेरठ (Meerut) येथील किदवाईतील अहमद नगर (Ahmed Nagar of Kidwai Nagar) येथे अशीच एक घटना घडली आहे. खरे तर ही घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाल्यामुळेच समजू शकली. एका तरुणाचा मित्रांसोबत रस्त्यावरुन चालताना मृत्यू झाला. ही घटना 2 डिसेंबरच्या रात्री 10:16 वाजता घडली. घटनेचा धक्कादायक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

व्हिडिओत पाहायला मिळते की, चार तरुण एका गटाने एका गल्लीतून असलेल्या रस्त्याने निघाले होते. हे चौघेही एकमेकांचे चांगले मित्र असल्याचे सांगितले जात आहे. रस्त्यावरुन जाताना एकमेकांशी गप्पामारत निघालेले हे तरुण सीसीटीव्ही फुटेजमध्येही पाहायला मिळतात. दरम्यान, गल्लीतून जात असतानाच अचानक एक तरुण अचानक खाली कोसळतो. त्याचे मित्र त्याला काय झाले म्हणून पाहतात तर तो निपचीत पडलेला दिसतो. त्याची काहीच हालचाल होताना दिसत नाही. (हेही वाचा, Video Of Devotee Dies Before Sai Baba Idol: साईबाबा चरणी भक्ताला मृत्यू; दर्शन घेताना हृदयविकाराचा झटका, CCTV Footage व्हायरल)

अचानक घडलेल्या या अनुचित प्रकारामुळे बाकीचे तीन मित्रही जोरदार घाबरतात. त्यांना धक्का बसतो. घाबरलेल्या आवस्थेतच ते खाली पडलेल्या मित्राला आवाज देतात. उठविण्याचा, उचलण्याचा प्रयत्न करतात. पण खाली कोसळलेल्या मित्राकडून कोणताच प्रतिसाद येत नाही. अखेर ते त्याला दवाखान्यात घेऊन जातात. डॉक्टरांनी उपचारापूर्वीच या तरुणाला मृत घोषीत केले.

व्हिडिओ

दरम्यान, ही घटना ज्या पोलीस स्टेशन हद्दीत येते त्या पोलीस स्टेशनच्या प्रमुखा अमित रॉय यांनी प्रसारमाध्यमांना सांगितले की, व्हिडिओची चौकशी आणि पडताळणी करण्यात आली आहे. चौकशीत अधिकाऱ्यांना असे आढळून आले की मृत व्यक्ती अनेकदा आजारी पडत असे. आजारपणामुळेच त्याचा मृत्यू झाला आहे.